https://vruttamasternews.com/buldhana-news-44/
डॉ रामप्रसादजी शेळके यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा.
देऊळगाव राजा –
सिंदखेडराजा मतदार संघातील उदयोन्मुख नेतृत्व देऊळगाव राजा येथील रहिवासी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस डॉक्टर रामप्रसादजी शेळके यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात त्यांच्या चाहत्याकडून साजरा करण्यात आला. ते एक समाज शील व्यक्तिमत्व असून फुले शाहू आंबेडकर आझाद विचार मंच ते संस्थापक असून त्या माध्यमातून विविध समाजसेवेचे उपक्रम ते राबवित असतात. शिक्षण क्षेत्राबद्दल त्यांना खूप आवड आहेत राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचे ते सचिव असून हे स्कूल या परिसरातील एकमेव सी बी एस इ चे नामवंत स्कूल आहे. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक व मानसिक विकासासाठी विविध उपक्रम त्यांच्या स्कूलमध्ये राबविले जातात. विविध क्रीडा स्पर्धा व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ते तन-मन-धनाने मदत करत असतात. त्याचबरोबर विविध शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, संस्थांनाही ते सढळ हाताने देणगीत देत असतात. अशा प्रकारे देऊळगाव राजा परिसरातील एक दानशूर व्यक्ती म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.
आपल्या वाढदिवशी सुद्धा त्यांनी सामाजिक भान ठेवून विविध उपक्रम राबविले. त्यांनी जालना येथील ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित केले , त्या शिबिरामध्ये 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले. ‘रक्तदान हे श्रेष्ठ दान” हा आजचा परवलीचा चा शब्द झाला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या धर्मपत्नी डॉक्टर्स सौ मीनल ताई शेळके यांनी सुद्धा डॉक्टर साहेबांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान करून राष्ट्रीय कार्यामध्ये आपले योगदान दिले आहे. शाळेमध्ये विविध औषधीय वनस्पतीची लागवड करण्यात आली ,त्याचबरोबर समाजातील दिन दुबळे व गरजू लोकांना गहू आणि तांदूळ या जीवनावश्यक अन्नधान्याची कीट तयार करून देण्यात आली. तसेच राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये डॉक्टर शेळके साहेबांचे” पुस्तक तुला” करण्यात आली व त्या वह्यांचे वाटप स्कूल मधील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना करण्यात आले. त्यांना वाढदिवसासाठी शुभेच्छा देण्यासाठी सिदखेडराजा मतदार संघातील सर्वपक्षीय नेते मंडळी कार्यकर्ते नागरिक यांची रीघ लागली होती. सर्वांनी त्यांना यथोचित सत्कार करून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारे या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा कला व साहित्य क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व डॉक्टर रामप्रसादजी शेळके यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्या कडून मोठ्या उत्साहात साजरा केला.
या कार्यक्रमात शाळेचे सीईओ सुजित गुप्ता , शैक्षणिक प्रमुख डॉ. प्रियांका देशमुख मॅडम, उप मुख्याध्यापक फैसल उस्मानी सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती.