https://vruttamasternews.com/buldhana-news-442-2/
अवैध रेतीचे ट्रॅक्टर पकडले महसूल प्रशासनची करवाई
सिंदखेड राजा/प्रतिनिधी
दिनांक 04/07/224 रोजी सिंदखेडराजा तालुक्यात अवैध रेती वाहतूक व उत्खनन प्रतिबंध्द करण्यासाठी मा.उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा व तहसिलदार सिंदखेडराजा यांचे मार्गदर्शनाखाली अवैध गौणखनिज प्रतिबंध पथक गस्त करणेकामी गेले असता लिंगा येथे ट्रॅक्टर वाहन क्रमांक MH 28 AG 8552 मध्ये 1 ब्रास अवैधरेती वाहतुक अढळुन आले. वाहन मालक सुदाम विश्वनाथ मुळे रा.लिंगा ता.सिंदखेडराजा यांचेकडे रेती वाहतुक परवाना अढळुन आला नाही. सदर वाहन पोलीस स्टेशन साखरखेर्डा येथे अटकावुन ठेवण्यात आले होते.सदर कारवाई मध्ये श्री प्रवीण धानोरकर तहसीलदार सिंदखेडाराजा, तलाठी , घरजाळे , पांडव यांनी मिळुन केली.
सदर प्रकरणात महाराष्ट्र जमिन महसूल संहिता 1966 मधील कलम 48 (7)(8), महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय गौखनि-10/029/प्र.क्र.9 ख-1 दिनांक 3/9/2019, शासन, महसूल व वन विभाग अध्यादेश क्रमांक गौखनि -10/0215/प्र.क्र.92/ख, दिनांक 12 जानेवारी,2018 मधील (6) नुसार तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार दिनाक 12 जून2015. मा.जिल्हाधिकारी, बुलडाणा यांचे पत्र दिनांक 04/जूलै,2015,दिनांक 03 फेब्रुवारी 2018 व दिनांक 7 डिसेंबर,2015 नुसार संबंधीत गैरअर्जविरुध्द 121500 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे