https://vruttamasternews.com/buldhana-news-45/
नराधाम तीन पुजाऱ्यांना फाशी द्या— विजयकांत गवई
बुलडाणा /सिद्धार्थ पैठणे
मुंबईतील मंदिरात तीस वर्षे महिलेवर तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करणाऱ्यांना फाशी देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने चिखली ठाणेदार यांना दि. 17 जुलै 2024 रोजी निवेदन देण्यात आले मुंबईतील महिला घरगुती भांडण झाल्याने ती वैतागली होती शांतता मिळावी म्हणून ही विवाहित महिला शिळफाटा गणेश घोळ मंदिरात गेले होती दिवसभर महिला त्याच मंदिरात बसून होते येथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दीले त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना त्या चहामध्ये त्यांनी भांगेची गोळी मिसळून दिले चहा पिल्यानंतर महिलेचे शुद्ध हरपली नंतर तीन पुजारांनी त्या महिलावर आळीपाळीने मंदिरातच तिच्यावर बलात्कार केला महिला शुद्धीवर आल्यानंतर आपल्या सोबत काहीतरी भयंकर घडल्याचं लक्षात आले तिने आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली पुजारांना समजताच तीन पुजारांनी महिलेला मारहाण करून तिचा खुन केला मंदिराच्या बाजूला जंगलात तिचा मृतदेह फेकून दिला मंदिरात महिला सुरक्षित नाहीत मंदिर राज्य सरकारने ताब्यात घेण्यात यावे काही दिवसातच महाराष्ट्रात सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली आहे आणि मंदिरातल्या नराधाम तीन पुजाऱ्यांनी लाडकी बहिणीचा बलात्कार मंदिरातच केला जीवाने मारून टाकले महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिणीच्या आरोपींना भर चौकात फाशी देऊन तिला न्याय देण्यात यावा अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आले निवेदन देतेवेळी रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजयकांत गवई, चिखली शहराध्यक्ष सुनील सोळंके, चिखलीशहर सदस्य प्रवीण नरवाडे, चिखली शहर सदस्य गोलु क्षिरसागर व कार्यकर्ते होते. ( मुख्यमंत्री यांच्या लाडकी बहिणीवर तिन नराधाम मंदिरातले पुजाऱ्यांनी आळीपाळीने बलात्कार केला तर मुख्यमंत्री काय करणार लाडकी बहिणीला न्याय मिळेल का— विजयकांत गवई )