https://vruttamasternews.com/buldhana-news-457-2/
अवैध वाळुमाफियांना आवर घाला अन्यथा राहेरी सोनोषी मार्गावर ठिया आंदोलन
वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष मधुकर शिंदे यांचा तहसीलदार यांना इशारा
सिंदखेड राजा /प्रतिनिधी
सिंदखेडराजा तहसिल कार्यालय च्या व कीनगावराजा पो स्टेशनच्या हद्दीत अवैध वाळु माफीयाचा हैदोस दिवसा ढवळया शासनाच्या नाकावर टिचुन सुरु आहे या वाळु तस्करांना कुठलीच भिती राहिलेली दिसत नाही सर्व सबंधीत अधीकारी यांच्या खिशातच घेऊन फिरतात कि काय असे वाटने चुकिचे होऊं नये अशी शंका वाटायला लागली आहे त्यामुळे या अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आवर घालावा अन्यथा राहेरी ते सनोशी दरम्यानच्या मार्गावर ठीया आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष मधुकर शिंदे यांनी तहसीलदार यांना इशारा दिला आहे
सदर रेतीचे भरलेले मोठमोठे वाहन रसत्याने गावातुन जात अस्ताना बेभान सुसाट वेगाने चालतात या गाड्यावरचे गाड़ी चालक मदधुंद अवस्तेत असतात कोणी अडवुन समज देण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर गाड़ी घालुंन जिवे मारण्याचा प्रयत्न करतात दादागिरी दमदाटी गल्लीघ्छ शिविगाळ करतात यावरुन लक्षात येते की वाळु माफिया याची वाढती दादागिरी व वाळु तस्करी खुप प्रमाणात वाढलेली आहे अनेक ठिकानी बेकायदा वाळुसाठे मोठ्या प्रमाणात केलेले आहेत त्याचे रितसर मोजमाप होऊन ते रेतीसाठे जप्त करण्यात यावा या आगोदरही आपल्या विभागाने रेतीचे वाहन पकडलेले आहेत त्यांच्यावर काय कारवाई केली याची सविस्तर लेखी माहिती द्यावीी रेती तस्कराला आपण जरब घालावा अन्यथा राहेरी ते सोनोशी मार्गावर शेकडो नागरीकासह ठिया आंदोलन
दि 8/7/2024/ रोजी सकाळी 11 00 वाजता करण्यात येईल याची सर्वस्व जवाबदारी संबंधीत शासनाची राहिल