buldhana news भीम आर्मीच्या मेळाव्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित रहा — भाई सिद्धांत वानखेडे

https://vruttamasternews.com/buldhana-news-468-2/

भीम आर्मीच्या मेळाव्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित रहा — भाई सिद्धांत वानखेडे

 

चिखली/ सिद्धार्थ पैठणे

गेल्या महिन्याभरापासून लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आणि उत्तर प्रदेशच्या नगीना मतदारसंघातून भरघोस मतांनी विजयी झाले त्यामुळे साहजिकच पक्षाला बळकटी येणार हे खरे बुलढाणा जिल्ह्यात सध्या तरी भर पावसात राजकीय वातावरण तापत असल्याचे दिसत आहे आझाद समाज पार्टीचे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून एक निष्ठेने कार्य करणारे भाई सिद्धांत वानखेडे यांची एकाकी उचल बांगडी करण्याच्या काही वृत्तपत्रात बातम्या झळकल्या परंतु आझाद समाज पार्टी तथा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सिद्धांत वानखेडे यांनी सुद्धा नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना टक्कर देण्यासाठी कुठलीही कसूर सोडलेली दिसत नाही. एकमेकावर झालेल्या आरोपीच्या आरोपांच्या फेरीनंतर जिल्हाध्यक्ष कोण? या प्रश्नासाठी जिल्ह्यात संभ्रम निर्माण असताना एकीकडे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष तर एकीकडे गेल्या पाच-सहा वर्षांपासून पक्षाचे एक निष्ठेने काम करणारे भाई सिद्धांत वानखेडे यांनी स्वतःही जिल्हाध्यक्ष असल्याची कबुली दिली तर कधी वरिष्ठांनी मला विचारात घेतले नाही यामुळे तर कधी मला वरिष्ठांनी सांगितले आहे की आमची असलेली महाराष्ट्रातील मीटिंग होईपर्यंत सध्या तरी तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात असे प्रसिद्धी पत्रकात व काही दैनिकात झालेल्या प्रसिद्धी पत्रकातून सामान्य जनता संभ्रमात होती, एवढेच नाही तर महाराष्ट्र प्रदेश प्रभारी यांचे सुद्धा नवनियुक्त तथा भाई सिद्धांत वानखेडे जिल्हाध्यक्ष यांनी भेट घेतली पक्षाच्या पडतीच्या काळात पक्षाला पक्षाचं नावारूप आणून देण्यासाठी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून कार्य करणारे तळागाळातील कार्यकर्ता जोडणारे तळागाळातील कार्यकर्त्यांना विधवा स्त्री पुरुष विद्यार्थी अनाथ अबाल शेतकरी यांना न्याय देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करणारे भाई सिद्धांत वानखेडे यांनी आंदोलनाचा सपाटा मात्र कधी थांबवला नाही वेळ कशीही असो आपलं स्वतःच कार्य कासव वतीने का होईना पण गेल्या पाच वर्षात शेकडो आंदोलने शेकडून निवेदने पक्षाची मीटिंग असेल यूपीचा कार्यक्रम असेल पक्षाच्या आदेशाप्रमाणे कार्य करत राहणारे सिद्धांत वानखेडे यांनी शेवटी आजही दिनांक 8 जुलै रोजी चिखली येथे पंचायत समिती सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे या मेळाव्यासाठी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी आनंदजी लोंढे तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत व या पक्षाच्या मेळाव्याला ते मार्गदर्शन करणार आहेत म्हणून या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आझाद समाज पार्टी तथा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सिद्धांत वानखेडे यांनी केले आहे या मेळाव्यात आता लाडकी बहीण असो शेतकऱ्याचा पिक विमा प्रश्न असो की विधवापरिकता महिला विद्यार्थी पुरुष लहान बालके पावसाळ्यात येणाऱ्या अडचणी शेतकरी शेतकऱ्यांना खत बियाणे किंवा शेतकऱ्याची त्यासाठी होत असलेली लूट या व पंचायत समिती जिल्हा परिषद स्तरावर पावसाळ्यात येणाऱ्या अडचणी या संदर्भात सर्व विषयावर इत्तम भूत चर्चा होणार आहे यासाठी सर्व विद्यार्थी लहान बालक अबाल वृद्ध माता भगिनी यांनी पंचायत समितीच्या सभा गृहात उपस्थित राहून आपले प्रश्न व आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी उपस्थित राहावे व वरिष्ठांचे मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सिद्धांत वानखेडे जिल्हाध्यक्ष भीम आर्मी यांनी एका प्रसिद्धी पत्रकात केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *