जे स्वतःच्या कुटुंबाचे झाले नाही ते तुमचे काय होणार
गायत्री शिंगणे यांच्या फेसबुक अकाऊंट वरून पोस्ट व्हायरल झाल्याने खळबळ
सिंदखेड राजा /प्रतिनिधी
जिल्हा कार्याध्यक्ष हे मुळात कोणासाठी काम करतात हे पूर्ण जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे, यांना पक्षाशी काहीच देणं घेणं नाही, यांनी लोकसभेला यांच्या धण्याच्या सांगण्यावरून कोणाचं काम केलं हे महाविकास आघाडीतील नेते तसेच कार्यकर्ते यांना तर माहिती आहेच, पण त्याचबरोबर महायुतीच्या नेत्यांना पण माहिती आहे.
मला मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघात सर्वसामान्य, सर्वजातीय, सर्वपक्षीय मतदारांचा मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून यांच्या मालकाच्या पायाखालची वाळू सरकलीतर आहेच. आणि यांच्या मालकांना हे पण माहिती आहे की महायुतीचे कार्यकर्ते पण यांचं काम करणार नाहीत. त्यामुळे यांच्या मालकांनी सांगितल्यानुसार हे बोलतात.
सिंदखेडराजा मतदारसंघात मा. पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. महायुती सरकारची शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला विरोधी असणाऱ्या धोरणांमुळे जनतेत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. मा. पवार साहेब व मा. उद्धव ठाकरे साहेब यांच्यासोबत केलेला विश्वास घात जनता अजूनही विसरलेली नाही. हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेला दाखवून दिलं आहे, आणि विधानसभेला अजून मोठ्या प्रमाणात यांना धडा शिकवणार आहे.
यांनी पक्षाच्या तिकीटावर जेवढी मतं घेतली होती ना तेवढी लोकं तर JCB ने खड्डे खोदणे चालू असताना पाहायला थांबतात.
आणि राहिला विषय सक्षम उमेदवार असण्याचा तर कै. सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे व कै. मुन्ना शिंगणे यांच्या यांच्या कुटुंबात अजूनही ती ताकत आहे.
(कै. सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे हे अपक्ष चं आमदार झाले होते ही गोष्ट जिल्हाकार्याध्यक्ष विसरलेले दिसतात.)
आणि आदरणीय जिल्हा कार्याध्यक्ष यांना एक सल्ला आहे की जे स्वतः च्या कुटुंबाचे नाही झाले ते तुमचे काय होतील.