Buldhana news सिंदखेडराजाचे भूमीपुत्र उज्वलकुमार म्हस्के आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

https://vruttamasternews.com/buldhana-news-49/

सिंदखेडराजाचे भूमीपुत्र उज्वलकुमार म्हस्के आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

 

बुलडाणा,(प्रतिनिधी )-

मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील भूमीपूत्र छत्रपती संभाजीनगर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नरत राहणारे उपक्रमशील शिक्षक उज्वलकुमार म्हस्के यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.

अजिंक्य केसरी प्रतिष्ठान द्वारे छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथील मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे आयोजित शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श शिक्षक उज्वलकुमार उत्तमराव म्हस्के यांना सन्मानीत करण्यात आले. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वाकोद ता-फुलंब्री जि. संभाजीनगर येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या उज्वलकुमार सरांनी आजवर हजारो विद्यार्थ्यांना घडविण्याचे महनीय कार्य केले आहे.निराधार विद्यार्थ्यांना दत्तक घेणे,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे साहित्य संमेलन-कवी संमेलन घेणे,विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे,क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणे,विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे या विविध उपक्रमांद्वारे त्यांनी आपले योगदान दिले आहे.या त्यांच्या कार्याची दखल घेऊन छत्रपती संभाजीनगर मधील “ अजिंक्य केसरी प्रतिष्ठानने “ हा पुरस्कार दिला.

उज्वलकुमार म्हस्के यांच्या या सन्माना बद्दल त्यांनी अजिंक्य केसरीचे समाधान वाणी व सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले असून त्यांच्या या यशा बद्दल मेघा म्हस्के,सुनील शिंदे,दिपक म्हस्के,नितीन मोरे,पत्रकार बाबासाहेब जाधव,सदाशिव बडक,विठ्ठलराव साळवे,सांडू शेळके,नितीन शेळके,मंगल पाटील,मंगला वेळे,संगीता वाढोनकर,नारायण जाजेवार,किशोर पळसकर, सतीश कठोरे,प्रसाद साळवे,गणेश धोटे,उल्हास ढेपले यांनी अभिनंदन केले आहे.या पुरस्कारा बद्दल मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्यातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *