buldhana news बुलढाणा बस स्थानकावर समस्यांचा डोंगर…… 

 

https://vruttamasternews.com/buldhana-news-5/

बुलढाणा बस स्थानकावर समस्यांचा डोंगर……

 

बस स्थानक प्रशासनाचे प्रवासाच्या सुविधेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

 

 

बुलडाणा बस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी की, गैरसेवेसाठी

 

बुलडाणा,(प्रतिनिधी) – बुलडाणा बस्थानक हे जिल्ह्याच्या केंद्रस्थानी बस्थानक आहे येथील बसस्थानकावर प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय नसून, प्रवाशांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. तसेच, बसस्थानकांवर अनेक सुविधांची वाणवा असून, प्रवासी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. तसेच, या बसस्थानकावरून स्थानिक बसेस वेळेवर बंद केल्यागेल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. सविस्तर असे की, बुलडाणा हे जिल्ह्याचे ठिकाण आहे, व प्रमुख शहर आहे येथून संभाजी नगर, पूणे, नागपूर, आमरावती, लातूर, मुंबई, नाशिक अहमदपूर, सुरत, बऱ्हाणपूर इतर अंतरराज्यीय लांब पल्ल्याच्या बसेस सुटतात तसेच बुलडाणा हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे शासकीय कामासाठी, न्यालयीन कामासाठी जिल्हा भरातून कामा निमित्त हजारो प्रवासी येत असतात व बुलडाणा शहराला लागून ३०ते ४० खेडी असल्यामुळे रोज बाजार हाट व वैयक्तीक कामासाठी हजारो प्रवासी एसटीने प्रवास करीत असतात त्यामुळे बस्थानकावर हजारो प्रवाशांची गर्दी असते तसेच येथे दर रविवारी आठवडी बाजार भरतो. आजुबाजुला असलेल्या वीस पंचवीस खेड्यापाड्यांतील ग्रामस्थांसाठी ही प्रमुख बाजारपेठ आहे. खाजगी वाहनांची संख्या वाढत असली तरी एसटी बसला प्राधान्य असते. तर खाजगी वाहनांचा थांबा बसस्थानकाजवळच असतो. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या प्रवाश्यांना वाहनांची वाट बघण्यासाठी बसस्थानकावरच थांबावे लागते. सुरुवातीला केल्या गेलेली पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेतील सामुग्री नादुरुस्त व तूटफुट झालेली असून दुरुस्ती न केलेली नाही त्यामुळे प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी आजूबाजूच्या हॉटेल्स मध्ये जावे लागते. नाहीतर पाण्याची बॉटल विकत घ्यावी लागते. बसस्थानकावरील फोन नेहमी नादुरूस्त असतो त्यामुळे प्रवाशांना चौकसी साठी नाहक बसस्थानकावर येवून चौकसी करावी लागते व प्रवाशांना मानसीक त्रास होतोच पण साध्या चौकशी साठी बसस्थानकावर येण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो स्थानिक अधिकारी यांच्याशी फोन बद्दल चौकसी केली असता तांत्रीक बिघाड म्हणून उडवावडवीचे उत्तर दिले जाते. त्यांच्या उतरातून असे दिसते की, आपला ह्या गोष्टीशी काहीच संबंध नाही, वेळ काढू पणाचे उत्तरे प्रवाशांना मिळतात, चौकशी कछेत प्रवाशांनी बस बद्दल चौकशी केली असता उत्तर मिळते बस येईल तेव्हा जाईल असे बे जबाबदारीचे उत्तर प्रवाशांना मिळते त्यांना व्यवस्थीत माहिती दिल्या जात नाही, बसेस नियोजीत प्लॅटफॉर्मवर लावल्या जात नाही त्यामुळे आडाणी प्रवासाची बस पाहण्यास इकडे तिकडे फिरावे लागते व बस कधी कधी निघून जाते यामुळे दुसरी बस मिळण्यासाठी त्याला विनाकारण ताटकळत बसावे लागते .त्यामुळे त्यांना विनाकारण मानसीक त्रास होतो व पाणी नसल्यामुळे त्यावेळेत त्याला विकत पिण्यास पाणी घ्यावे लागते त्याला विनाकारण आर्थिक नुकसान सोसावे लागते. बसस्थानकावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्यावर धूळीचा परिणाम होत आहे. बस्थानकावरील व्यापारी संकूलातील हॅाटेलचे घाण पाणी व्यापारी संकूलाची नाली चोकप झाल्यामुळे ते घाण पाणी बस्थानकावर येते त्यामुळे त्या घाण वासाचा त्रास प्रवासांना होत आहे. बस्थानका हे टू व्हिलर फोरव्हिलर चे वाहानस्थळ बनलेले दिसते. एखांद्या वेळेस मोठा अपघात ही होऊ शकतो तसेच या खाजगी वाहनामुळे प्रवाशांना बस पकडण्यासाठी त्रास होत आहे. गेट वर सुरक्षा स्थळाचे गेटवर सुरक्षा सेड फक्त शोभेची वस्तू म्हणून बांधलेली दिसते गेटवर कधीच सुरक्षा रक्षक दिसत नाही. बसस्थानक कोणते आहे याचे नाव नाही बिना नावाचे बस्थानक. एसटी महामंडळाचे ब्रीद वाक्य आहे की, प्रवाशांच्या सेवेसाठी, बहुजन हिताय बहुजन सुखाय, एसटीची जाहीरात बसस्थानकावर चालू राहते एसटीचा प्रवास सुखकर प्रवास, एसटीनेच प्रवास करा हे वाक्य व ही जाहीरात फक्त कागदावर व जाहीराती पूरतीच आहे का ? बस्थानकावरील कारभारावरून असे दिसते की, हे बस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी आहे की, गैरसेवेसाठी आहे. ” प्रवासी आमचे दैवत आहे ” हे एसटीचे वाक्य तर कर्मचारी विसरूनच गेलेले दिसत आहे. या गैरसोईची प्रवासी वर्गातून ओरड होत आहे. याकडे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी वेळीच लक्ष घालून ही प्रवासी गैरसोयीवर उपाययोजना करण्याची गरज आहे. असी प्रवासी वर्गातून मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *