https://vruttamasternews.com/buldhana-news-501-2/
आम्ही वृक्ष देतो तुम्ही त्याचे संगोपन करून जगवा
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे |
असे संत तुकाराम महाराज आपल्याला सांगून गेलेत…आजही चातका प्रमाणे आपण पावसाची वाट पाहत आहोत…परंतु समाधानकारक पावसाळा झाला नाही… उन्हाळ्यात उष्णतेमुळे सर्वत्र उन्हाच्या झळा आपल्याला पोचल्यात ना? प्रत्येक ऋतू कसा त्रासदायक ठरत आहे… हे आपण अनुभवतोय ….या सर्व घटनांमागे कोण? आपणच ना….चला तर मग ओसाड झालेल्या रानमाळाला… निसर्गाला… जीवित करण्याचं कामही आपणच करूया… त्यासाठी आपल्या मदतीसाठी *धरती बचाओ परिवार* आपल्या सोबत आहे…
आमच्याकडे *वडाची रोपे* आणि *पिंपळाची रोपे* उपलब्ध आहेत… परंतु खालील अटीप्रमाणे
1) रोपे अशा ठिकाणी लावायची कीजी भविष्यात तोडल्या जाणार नाहीत. आपल्या शेताच्या बांधावर किंवा मोकळ्या जागेवर.
2 )रोपे लावून जगवण्याची जबाबदारी घेईल त्यांनाच रोपे देण्यात येतील .
3)रोपे नेणाऱ्यांचे रेकॉर्ड ठेवण्यात येईल. वृक्षारोपणापासून पुढील तीन वर्ष हे सर्व रेकॉर्ड मेंटेन करून त्याचा संकलित अहवाल सरकारला सादर केल्या जाईल.
4) एका कुटुंबाला जास्तीत जास्त दोन वृक्ष रोपटे देण्यात येतील.
5) आपणास वृक्ष लावण्याची इच्छा आहे परंतु जागा उपलब्ध नाही अशांना आम्ही जागा सुद्धा उपलब्ध करून देऊ.
*विनित:-*
*धरती बचाओ परिवार*
संपर्कासाठी खालील नावे
1)वनश्री जनाबापू मेहेत्रे
मो.82 75 23 33 77
2)सौ.लताताई राजपुत मॅडम
मो:- 78 87 61 61 70
3)सौ.क्रांती मॅडम
मो.97 63 32 74 73
4)सौ.विद्या मॅडम
मो.88 222 830 31
रोपे मिळण्याचे ठिकाण
देऊळगाव राजा बस स्टॅन्ड मागे सिव्हिल कॉलनी नुपूर संगीत कला मंदिर देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा