https://vruttamasternews.com/buldhana-news-508-2/
सरसगट पीकविम्या साठी ‘बळीवंश’ करणार 15 ऑगस्ट ला गावोगावी आत्मक्लेश
_बालाजी सोसे, गजानन जायभाये सह अनेक सहकारी घेणार सामूहिक जलसमाधी_
_पीकविम्या सह इतर 5 मागण्या ही समाविष्ट_
सिंदखेड राजा /प्रतिनिधी
मागील गेल्या सात महिन्यांपासून नुकसान भरपाई पोटी हक्काचा पीकविमा मिळवून घेण्यासाठी सुरु असलेला शेतकऱ्यांचा लढा प्रशासन व पीकविमा कंपनी च्या गलथान कारभारामुळे अजूनही प्रलंबित आहे. सद्या सुरु असलेलं पिकवीमा वाटप हे रब्बीच असून तेही तटपून्ज असून फक्त 11 कोटी रुपयांची मलमपट्टी आहे, प्रत्यक्षात मागणी खरीप 2023-24 ची असताना रब्बीचा पीकविमा देऊन कंपनी शेतकऱ्यांची आणि प्रशासनाची फसवणूक करत असल्याच दिसून येत आहे.
काल मौजे जागदरी येथे बळीवंश लोकचळवळीच्या वतीने परिसरातील शेतकरी बांधवांच्या बैठकी चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी असंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत खरीप 2023-24 चा सरसगट पीकविमा, वन्य प्राणी याचा कायमचा बंदोबस्त, गावोगावी शेतरस्ते आराखडा मंजुरी, प्रलंबित पंतप्रधान किसान सन्मान निधी च्या खात्यांना मंजुरी, बँकांनी थकीत पीककर्जा मुळे लावलेले होल्ड तात्काळ उठविणे, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी इत्यादी मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
यावेळी बाळसमुद्र, कंडारी, भंडारी, राजेंगाव, शेंदुर्जन, हिवरा गडलिंग सह शेजारील अनेक गावांची मंडळी बहुसंख्येने उपस्थित होती.
सामूहिक आत्मक्लेश
अनेक महिन्यांपासून बळीवंश या प्रश्नांचा पाठपुरावा गल्ली पासून दिल्ली पर्यंत करत आहे परंतु कुणीच या प्रश्नाकडे गंभीर्याने बघत नसल्याचे दिसून आल्याने येत्या स्वातंत्र्य दिनी दे राजा व सिंदखेड राजा तालुक्यातील गावोगावी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून शासनाचे लक्ष वेधणार आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी देखील वन्य प्राण्यांच्या प्रश्नांसाठी बळीवंश ने केलेल्या आंदोलनास तालुक्यातील तब्बल 54 गावांनी प्रतिसाद दिला होता.
आज झालेल्या बैठकीला श्री नितीन कायंदे, बालाजी सोसे, गजानन जायभाये, ज्ञानेश्वर खरात, देवानंद खेडकर, केशव जायभाये, जागदरी येथील बळीवंश चे सक्रिय सदस्य गजानन जायभाये,डॉ सतीश जायभाये, स्वप्नील सांगळे यांच्या सह गावातील अनेक पदाधिकारी, जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
आत्मक्लेश आंदोलनाला सामूहिक जलसंमाधी ची जोड
सदर प्रश्नांसाठी अनेक वेळा आंदोलन केलेले बळीवंश चे सभासद श्री बालाजी सोसे, श्री गजानन जायभाये यांच्या सह अनेक सहकारी स्वतंत्र दिनी सामूहिक जलसमाधी आंदोलन करून शासनाचा व पीकविमा कंपनी चा निषेध करणार आहेत.
आंदोलनात 100 गावे सहभागी होतील-नितीन कायंदे
बळीवंश लोकचळवळीने एकदा काम हाती घेतलं की पूर्णतःवास जाई पर्यंत पाठपुरावा सोडत नाही हे शेतकरी प्रत्येक वेळी अनुभवत आहेत त्यामुळे परिसरातील शेतकरी या आंदोलनात स्वेच्छेने सहभागी होण्यासाठी संपर्क साधतं आहेत, आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी संपर्क साधतं पीकविमा कंपनी प्रति आपल्या तीव्र भावना व्यक्त करत हे आंदोलन मोठं करू असं आश्वासित केल आहे, यावरून यावेळी तब्बल 100 गावे या आंदोलनातं सामील होतील असं बळीवंश लोकचळीचे श्री नितीन कायंदे यांनी सांगितले.