बुलढाणा/प्रतिनिधी
https://vruttamasternews.com/buldhana-news-53/
सिद्धार्थ खरात यांच्या सेवा गौरव पूर्ती च्या निमित्ताने….त्यांच्या विषयी जाणून घेवूया
मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील ताडशिवनी येथील सिद्धार्थ खरात या ध्येयवेड्या तरुणांच उच्चशिक्षण परिवर्तनवादी चळवळीचे केंद्र असलेल्या, मिलिंद महाविद्यालयात झाल्यानंतर एमपीएससीच्या माध्यमातून मंत्रालयात कक्ष अधिकारी ते उच्च पदस्थ सहसचिव अधिकारी याचबरोबर राज्य शासनातील विविध मंत्र्याकडे खाजगी सचिव म्हणून काम केलं .
हे सर्व करत असताना आपल्या मूळ गावी मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याशी आपल्या मातीसोबत जिव्हाळा कायम राहिला ,
मुळातच आईचे संस्कार ,आई रेश्माबाई खरात म्हणजेच विदर्भाची बहिणाबाई ,म्हणून ओळखल्या जाते. त्यांच्या कवितेवरती वारकरी संप्रदायाचा आणि बहिणाबाईचा प्रभाव आहे .
संत नामदेव संत तुकाराम संत ज्ञानदेव संत कबीर या आपल्या संतांनी दिलेला समतेचा आणि बंधुत्वाचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्यक्षात रुजविण्याचाच काम केलेल आहे .
हा विचार ते सातत्याने मांडत असतात.
याचाच पुढचं पाऊल म्हणून त्यांनी जिल्हाभरातील सगळ्या जाती-धर्मातील चळवळीतील माणसांना एकत्र जोडून ,उत्कर्ष फाउंडेशनची स्थापना केली.
मुळातच चळवळीचां वारसा असलेले सिद्धार्थ खरात यांच्या मनात आपल्या मातीतील माणसाच्या हाताला रोजगार मिळावा या हेतूने असंख्य गावात दूध संकलन केंद्र सुरू करून ,सकाळीच मंत्रालयातील अधिकारी गावगाड्या तील दूध संकलन केंद्राला भेट देवून तेथील दूध उत्पादक शेतकरी यांच्या समस्या जाणून घेतो आणि त्यावर तात्काळ तोडगा काढून शेतकऱ्यांचे समाधान करण्याचे काम करतो . त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता पेरण्याचे काम , सामाजिक , सांस्कृतिक क्षेत्रात केलेले काम, जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त येणाऱ्या जिजाऊ भक्तासाठी दरवर्षी शिव खिचडी करून जिजाऊ शिवराय यांचे विचार पेरण्याचे काम सिद्धार्थ खरात यांनी केले आहे , जिजाऊ सृष्टीवर पुस्तक विक्री,करून फुले शाहू आंबेडकर वादी प्रखर भूमीका घेतली .
त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील साहित्यिक, कलावंत लेखक चळवळीतील कार्यकर्ते , पत्रकार यांना उत्कर्ष पुरस्कार प्रदान केला .
तर ज्या महाविद्यालयात आपण शिकून मोठे झालो त्या महाविद्यालयाच्या प्रांगणात आंबेडकर नायक पुरस्काराचे सुद्धा वितरण केले .दरवर्षी पंढरीच्या विठुरायाला पायी वारीने जाऊन नामदेव तुकाराम यांचा विचार म्हणजेच फुले शाहू आंबेडकरांचा विचार रुजण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले सिद्धार्थ खरात तीस वर्षाची अखंड सेवा पूर्ण करून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली .तीस वर्षाच्या काळामध्ये विविध जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्यांनी आपला विचार रुजवण्याचे काम केले. त्यामुळेच स्वेच्छा निवृत्ती झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील गावगाड्यातील माणसात एकच चर्चा होऊ लागली आपल्या माणसाचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा बुलढाणा जिल्ह्याच्या मुख्यालयात झाला पाहिजे हा हेतू समोर ठेवून त्यांचा सेवापूर्ती गौरव गोवर्धन सभागृह बुलढाणा अर्बन समोर बुलढाणा 27 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता शनिवारी आयोजित करण्यात आलेला आहे. या सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक असून मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या शुभ हस्ते होणार आहे .
याचबरोबर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ किरण पाटील जिल्हाधिकारी , प्रा.डॉ सदानंद देशमुख, सुनील जी शेळके, डॉ नरेश जी बोडके, दिनेश जी गीते , डी. टी. शिपने यांच्या सह असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न होणार आहे .तरी या सेवागौरव सोहळ्यासाठी आपण सर्व उपस्थित राहून शुभेच्छा द्याव्यात
- असे आवाहन सेवापुर्ती गौरव सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.