https://vruttamasternews.com/buldhana-news-536-2/
शेळगाव अटोळ येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या.
चिखली ( बुलढाणा ) : – सततची नापिकी व कर्जबाजारी पणामुळे ५० वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्रशासन करुण आत्महत्या केली. ही घटना शेळगाव अटोळ येथे १९ जुलै रोजी घडली .
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेळगाव अटोळ येथील रहिवाशी असलेले शेतकरी रामहरी भिकाजी अंभोरे वय ५० वर्ष त्यांच्याकडे गावा लगत अडीच एकर कोरडवाहू शेती आहे . या शेतीवर त्यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा चिखली शाखेकडून ८९ हजार पिककर्ज घेतले होते . परंतु सततची नापीकी मुळे ते बँकेच्या पिककर्जाची परतफेड करू शकले नाही तसेच यावर्षी शेतात सोयाबीनची पेरणी केली परंतु सोयाबीन वर पडलेला किडरोग आणि पिकांमध्ये उगवलेले मोठया प्रमाणावर तन हे पाहून आता सोयाबिन पिकही हातातून जाणार त्यामुळे बँकेच्या पीककर्जाची परतफेड कशी करावी तसेच कुंटूबांचा उदरनिर्वाह कसा चालवावा असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला या नैराश्यपोटी त्यांनी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली .घरातील कर्ता पुरुष गेल्याने गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत अशी माहिती डॉ मिसाळ यांनी अंधेरा पोलीस स्टेशनला दिली . पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार कैलास उगले यांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचासमक्ष पंचनामा करूण मर्गं दाखल केला आहे.