Buldhana news अंबाशी येथील अपहरण झालेल्या चिमुकल्या “अरहान” ची हत्या ! नातेवाईकांनेच केला घात ! समाजमनाला सुन्न करणारी घटना.

https://vruttamasternews.com/buldhana-news-54/

अंबाशी येथील अपहरण झालेल्या चिमुकल्या “अरहान” ची हत्या !

नातेवाईकांनेच केला घात !

समाजमनाला सुन्न करणारी घटना.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार.

 

सुनिल अंभोरे/ प्रतिनिधी

 

चिखली तालुक्यातील अंबाशी येथील शेख अरहान शेख हारूण वय नऊ वर्ष त्याचे दिनांक 22 जुलै रोज सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता अपहरण झाले होते. सोशल मीडियावर तो बेपत्ता असल्याची बातमी व्हायरल झाली होती. सकाळपासून तेव्हापासून तो बेपत्ता होता. घरातील मंडळींनी आणि गावकऱ्यांनी त्याची शोधाशोध केली होती. परंतु तो कुठेही आढळून आला नाही. विशेष म्हणजे चिमुकल्याची शोधाशोध घेत असताना आरोपीही गावातील लोकांसोबत शोध घेताना दिसत होता अशी माहिती मिळाली.अखेर त्याच्या घरच्या लोकांनी चिखली पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी तपासाला सुरुवात केली. बेपत्ता होण्याच्या शेवटच्या क्षणी तो शाकीर या आत्या भावासोबत दिसून आल्याचे माहिती मिळाली. 23 तारखेला संशयित आरोपी म्हणून खून झालेल्या अरहान च्या आते भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले व कसून चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान त्याने चिमुकल्याचा दोरीच्या साह्याने गळा आवळून खून करून घराजवळ असलेल्या शेणाच्या ऊकंड्यांमध्ये त्याचा मृतदेह पुरून टाकला. असे त्याने प्राथमिक माहिती दिली. विशेष म्हणजे या घटनेमध्ये खून झालेला हा मामे भाऊ तर खून करणारा हा आते भाऊ च एकमेकांचे नातेवाईक आहे असे कळते.23 जुलैला रात्री नऊ वाजेच्या दरम्यान कडक पोलीस बंदोबस्तात खून झालेल्या चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढून रात्री उशिरा चिखली येथे वैद्यकीय तपासणीसाठी व शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला होता. 24 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता अंबाशी येथे शोकाकुल वातावरणामध्ये त्या चिमुकल्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चिमुकल्याचा खून करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेमध्ये आणखी कोण कोण सामील आहे? आणि खून का केला ?हे स्पष्ट होईलच पुढील तपास पोलीस करीत आहे. पोलीस तपासात खुणाचे कारण स्पष्ट होईलच. पोलीसांची समय सूचकता , कडक बंदोबस्त यामुळे गावात तणावपूर्ण शांतता आहे. घडलेल्या घटनेने अंबाशी गावासह परिसरात घबराट पसरली असून समाजमन सुन्न झाले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *