https://vruttamasternews.com/buldhana-news-55/
सरकारी नोकरी लागल्यामुळे बायकोने काढले नवऱ्याला घराबाहेर .
. जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार .
————————————————
चिखली ( बुलढाणा ) : – अतिशय गरीब परिस्थीती असतांना असतांनाही जमीन जुमडा विकून बायकोला शिकविले आणि सरकारी नोकरीला लावले . मात्र सरकारी नोकरी लागताच बायकोने चक्क नवऱ्याला घरातून हाकलून लावले अशी तक्रार चिखली तालुक्यांतील गुंजाळा येथील संजय पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे दाखल केली आहे .
सविस्तर असे की चिखली तालुक्यांतील गूंजाळा येथील रहिवाशी असलेले संजय केशव पवार यांचा विवाह समाजाच्या रितीरिवाजा नुसार मामा पुरुषोत्तम सुखदेव भांड बिबी, ता. लोणार, जि. बुलढाणा यांची मुलगी पूजा भांड सोबत दि. 16/05/2004 मध्ये विवाह झाला होता . सूरवातीला आनंदात संसार सुरू होता त्यांना दोन मुली आहेत. मात्र पत्नीचे शिक्षण 12 वी (विज्ञान) असल्याने पुढील शिक्षण देवून स्टाफ नर्सिंगचा ४ वर्षाचा कोर्स पुर्ण केला यासाठी शिक्षणासाठी दोन एकर शेती विकावी लागली होती . कोर्स पूर्ण झाल्यानंतर पत्नीला आरोग्य विभागात स्टाफ नर्स म्हणुन कंत्राटी पद्धतीने नोकरी मिळाली. नोकरी लागल्याने आनदांत दोघे पती-पत्नी भाड्याने खोली करून नोकरीच्या ठिकाणी राहत असे. परंतु काही महिन्यानंतर पत्नीला आरोग्य विभागात कायमस्वरूपी नोकरीमध्ये सामावुन घेतले असता लगेच काही महिन्यातच पत्नीचे राहणीमान बदलले आणि रात्री घरी उशिरा येण्याचा प्रकार सुरु झाल्याने दोघांमध्ये वाद होऊ लागले. याचेच कारण पुढे करून पत्नीने पती सोबत राहण्यास नकार दिला. वाद मिटविण्यासाठी आम्ही नातेवाईकांना घेवुन गेलो असता पत्नीने साफ नकार देत मला पतीसोबत राहायचे नाही आणि पतीने माझ्याकडे येवुनही पाहू नये अशी ताकीद दिली. त्यामुळे गेल्या पाच वर्षापासुन पतीला घरात प्रवेश देत नाही मुलींनाही भेटू देत नाही त्यामुळे पतीची स्वतःची जमीनही गेली आणि दोन्ही मुलीपासुन नजरेआड केल्या . तरी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ न्याय द्यावा अशी मागणी संजय केशव पवार यांनी केली आहे . त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे .