https://vruttamasternews.com/buldhana-news-57/
रोही या वन्य प्राण्याच्या भीतीने मूग उडीद भुईमूग पिकाचा पेरा घातला
चिखली/ सिद्धार्थ पैठणे
तसा भारत हा कृषिप्रधान देश आहे मग सहाजिक च कृषीप्रधान देशात शेती या व्यवसायावर जास्तीत जास्त भर दिला जातो. किंवा शहरी भाग औद्योगिक कंपन्या नसल्यामुळे बहुतांश 90% शेतकरी हे शेती शेती पिक व शेतीमालावर अवलंबून असतात. परंतु जशी पूर्वीच्या काळी बारा बलुतेदार पद्धती असायची व 12 बलुतेदार पद्धतीमुळे सर्व गावातील लोकांचे कामेही गावातल्या गावात व्हायची, त्यामध्ये मोबदल्यात आपल्या शेतात पिकणारा अन्नधान्य देऊन त्या त्यांच्या गरजा पूर्ण करून जणू सुखी व समाधानी जगत होते.परंतु आपण म्हणतो त्या हिशोबाने जग जरी विज्ञान युगात जगत असले तरी शेतकऱ्याचा खर्च आणि त्यातून निघणार उत्पन्न याचा कुठेतरी ताळमेळ बसताना दिसत नाही शेतकरी व शेतीचे दिवसेंदिवस होत असलेले तुकडे ज्या ज्या शेतकऱ्याकडे भले मोठे 20, 20 30 एकर शेती असायची त्यांच्याकडे आता शेती पाच पाच चार चार एकर वर येऊन ठेपली आहे पूर्वी भुईमूग उडीद या कडधान्याच्या डाळी मुबलक प्रमाणात उपलब्ध असायच्या परंतु गेल्या चार-पाच वर्षात रोही हरीण या वन्य प्राण्यांनी शेतकऱ्यांच्या मुळावर असा हैदोस घातलाय की तुम्ही जर एखाद्या शेतातल्या विशिष्ट कोपऱ्यात जरी उडीद किंवा भुईमूग याची पेरणी केली तरीही रोही हा प्राणी बरोबर तेच झाड शोधून त्याला समूळ नष्ट केल्याशिवाय राहत नाही मग जर आपण नागरणी वखरणी पेरणी करून जर ते धान्य आपल्या पदरी पडत नसेल तर ते पेरायचेच कशाला? म्हणून आता शेतकऱ्यांनी सरसकट सोयाबीन या पिकाला पसंती क्रम देऊन शेती करण्याचे ठरविले आहे परंतु भविष्यात शेतकऱ्यांना स्वतःच्या घरासाठी तरी डाळीची आवश्यकता पडणारच डाळीची आवश्यकता स्वतः घाबरलेला शेतकरी जर पूर्ण करीत नसेल तर विकत घेणे ही त्याला परवडेल का असा सर्वसामान्य माणसाला हा पडलेला प्रश्न आहे. एकीकडे कृषीप्रधान म्हणणाऱ्या देशात आपण आयात करते आहोत किंवा आपण आयात करते नसून आपण हे डाळी पूर्वी निर्यात करायचो शेतकऱ्यांच्या हाताला त्यामुळे काम मिळायचे गोरगरिबांचे काम मिळायचे त्यांच्या घरातही मुबलक प्रमाणात डाळी उपलब्ध असायच्या परंतु उडीद मूग भुईमूग झाडाची शेंगही न खाणाऱ्या शेतकऱ्याला मनापासून त्रासल्यासारखं होतंय की शेतीचा एवढी मोठी मेहनत करून जर त्याला काहीही मुबलक प्रमाणात धान्य उपलब्ध होत नसेल तर मग ही करायची कशासाठी आणि याचाच मनात एक राग धरून शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती क्रम देऊन उडीद मूग भुईमूग पिकाची पेरणी कमी केली परिणामी शेतकऱ्यांना याचा आज ना उद्या भविष्यात खडतर प्रवासाला सामोरे जावे लागेल व याला कारण असलेल्या रोहि व हरिण या वन्य प्राण्यांचा जर महसूल प्रशासन किंवा फॉरेस्ट विभागाने याचा बंदोबस्त जर केला किंवा शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात मदत मिळाली तर आताचे सुरू झालेले आंदोलन हेच ही थांबतील व शेतकऱ्यांना खूप चांगला दिलासा मिळेल एकीकडे वाढती रोही हरीण यांची संख्या पाहता बुलढाणा जिल्ह्यात प्रथम रोही मारण्याची परवानगी मिळाली याचा खूप मोठा गाजावाजा केला गेला परंतु जिल्ह्यात आतापर्यंत बोटाच्या कांड्यावर मोजण्यासारखे परवाने मिळाल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे जिल्ह्यात किंवा प्रत्येक रेंज कार्यालयातून फक्त बोटावर मोजण्यासारखे म्हणजे एक किंवा दोन परवाने मिळाल्याच्या माहिती आहे मग जर एखाद्या गोष्टीचा एवढा गाजावाजा करायचा तर तो प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचतोय की नाही याची जणू प्रशासनाला स्वयं सुतुक राहिले नाही म्हणून सामान्य शेतकऱ्याच्या या हाकेला साथ देऊन महसूल व वन विभागाने याच्यावर तात्काळ कार्यवाही करावी ही सामान्य जनतेची मागणी आहे