https://vruttamasternews.com/buldhana-news-589-2/
बुलडाणा/रामदास कहाळे
ताडशिवणी गावातील भारती कैलास भोसले हिने गावातील पहिली महिला पोलिस होण्याचा बहुमान प्राप्त करत राज्यातून प्रथम क्रमांक मिळवून राज्यभर ताडशिवणी गांवचे नाव लौकिक केले आहे ,ताडशिवणी गावांमधील मंत्रालयातील गृह विभागाचे सह सचिव सिद्धार्थ खरात यासह डॉक्टर , शिक्षक इंजिनिअर, वकील, व उचस्पद अधिकारी आहेत परंतु ताडशिवणी या ग्रामीण खेड्या गावांत अद्यापही पोलीस विभागात कोनी नव्हते परंतु भारती कैलास भोसले यांच्या रूपाने पहिली पोलीस ताडशिवणी गावाला मिळाली म्हणून ताडशिवणी ग्रामपंचायत व विदर्भ पोलीस भर्ती पूर्व करियर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्वागत सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात थाटा माटात गावातून भव्य रॅली मिरवणूक काढून करण्यात याला यावेळी सम्पूर्ण गावांत अतिशय आनंदाचे वातावरण होते गावातील सर्व आप्तेष्ट नातेवाईक व गावातील नागरिक जनसमुदाय खूप मोठ्या संख्येने उपस्थित होता या प्रसंगी पंचक्रोशीतील प्रसिद्ध
नामवंत व्यक्ती यांनी सुध्दा आपली उपस्थिती दर्शवली होती यावेळी
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ श्रीराम राठोड (माजी संचालक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड )हे होते
प्रमुख अतिथी म्हणून व मार्गदर्शक म्हणून
डॉ. डी,एस सिंदे हे होते
प्रा शेख सर विदर्भ पोलीस प्रशिक्षण करियर अकॅडमी संचालक लोणार ,व त्याच्या 40 प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते
विनोद नरवडे ठाणेदार किंनगाव राजा
प्रा. गजेंद्र देशमुख दुसरबीड
, ग्रामसेवक रामदास म्हेत्रे , सरपंच प्रकाश खरात जांभोरा
, गोविंद देशमुख पोलीस पाटील,
मा सरपंच कैलास भूमकर ताडशिवणी यांच्या सह
गावांतील नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते मान्यवरांनी विध्यार्थ्याना मार्गदर्शन केले
सूत्रसंचालन प्रा गवई सर व ग्रामपंचायत सदस्य अमोल खरात यांनी केले