https://vruttamasternews.com/buldhana-news-59/
राशन कार्ड विभागातील लुट थांबवा अन्यथा भिकमांगो आंदोलन करू— रिपब्लिकन सेना
बुलडाणा /सिद्धार्थ पैठणे
चिखली तहसील कार्यालयात राशन कार्ड आणि दुय्यम प्रत विभक्त राशन कार्ड चे शंभर रुपये घेतले जातात आणि त्याची पावती नागरिकांना देत नाही अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने चिखली तहसीलदार यांना निवेदन 29 जुलै 2024 रोजी देण्यात आले.
तहसील कार्यालयात पावती न देता अनाधिकृत पणे शंभर रुपये प्रति रेशन कार्डचे घेतल्या जातात त्या पैशाबद्दल कोणतीच पावती राशन विभाग मार्फत नागरिकांना दिले जात नाही तर राशन कार्ड चे शंभर रुपये प्रति नागरिकांकडून घेतलेल्या पैशाचे काय करतात आणि कोणाला देतात राशन कार्ड ची खरी किंमत किती आहे त्याचे फलक तहसील कार्यालयात लावण्यात यावे राशन विभागातील कर्मचारी हे राशन कार्ड चे शंभर रुपये प्रति घेऊन नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करतात चिखली तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे आर्थिक शोषण थांबवा अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने भिकमांगो आंदोलनाचा इशारा रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयकांत गवई यांनी निवेदनामध्ये दिला. निवेदन देतेवेळी बुलढाणा जिल्हा महासचिव सलीमभाई, चिखली शहर उपाध्यक्ष सतीश पवार, शाखा अध्यक्ष सौरभ बावस्कर, शहर सदस्य दीपक तायडे, सिद्धेश्वर माघाडे होते.