युवा शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
बुलडाणा / सिद्धार्थ पैठणे
दे राजा तालुक्यातील मौजे अंढेरा येथील युवा शेतकरी ज्ञानेश्वर ओंकार तेजनकर वय ३८ वर्षे याने सततच्या नापिकीमुळे तसेच घटते उत्पन्न ,कुठल्याच शेतमालाला भाव नसल्याने कर्जाचा वाढता डोंगर तसेच घरातील आर्थिक परिस्थितीला कंटाळून दि.२० मे २०२४ रोजी रात्री दहा वाजता आपल्या शेतात विष प्राशन केले. ञास होऊ लागल्याने सोबत असलेल्या आपल्या चुलत भाऊ प्रविण तेजनकर याला सांगितले त्याने तात्काळ गावात फोन करून सांगितल्याने तात्काळ गावातील अॕम्बुंलसने त्याला पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले होते.दुसर्या दिवशी त्याला संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालय (घाटी) येथे उपचारा दाखल केले होते.दरम्यान ह्रदय डॅमेज)ठोके कमी झाल्याने दि.२३ मे २०२४ रोजी सकाळी साडेसात वाजे दरम्यान मृत्यू झाला.
सदर युवा शेतकरी ज्ञानेश्वर ओंकार तेजनकर यांच्यावर अंढेरा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकचे अंदाजे नव्वद हजार रुपये पिक कर्ज होते.तसेच खाजगी कर्ज असल्याने ते वाढत असल्याने तो नेहमीच आर्थिक विवंचनेत असायचा या सगळ्या परिस्थितीला कंटाळूनच त्याने आपली जिवनयाञा संपविली.त्याच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, एक मुलगी,आई, भाऊ, बहिण असा बराच मोठा आप्त परिवार आहे.