https://vruttamasternews.com/buldhana-news-61/
देऊळगाव घुबे येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
चिखली /सिद्धार्थ पैठणे
आज तालुक्यातील दे घुबे 1/8/2024 रोजी सकाळी 8. वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले .त्यांच्या जीवन चरित्रावर मत मांडताना जानकीदेवी विद्यालयाचे अध्यक्ष श्री शेनफडरावजी घुबे यांनी आजही अण्णाभाऊ साठेंचे विचार समाजासाठी किती गरजेचे आहे हे सांगून शिक्षणाचे महत्त्व विशद केले.आजही आपण शिक्षणाविषयी जागृत होण्याची गरज आहे असे मत यक्त केले.सोबतच प्रा. उद्धवराव घुबे यांनी सुद्धा आपले मत व्यक्त करतांना अण्णाभाऊ साठे यांनी पोवाड्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवले व त्याचे काही उदाहरणे विशद केली.या वेळी समाजाचे तरुण तरुणी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . त्यासोबतच गावातील प्रतिष्ठित नागरिक भाजपा ता. उपाध्यक्ष श्री विष्णू पाटील घुबे सर्व ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील.भगवान पाटील घुबे. दिनकर पाटील घुबे .गजानन पाटील घुबे. प्रवीण घुबे. दत्तू भाऊ घुबे. गणेशराव घुबे माजी सैनिक भाऊराव घुबे. सो.अध्यक्ष दिनकर पाटील घुबे. व इतर महिला .विद्यार्थी. आणि पालक वर्ग उपस्थित होता.*