ई केवायसी चे काम सेतू सेवा केंद्राकडे अथवा पर्यायी व्यवस्था करा
अन्यथा ई के वाय सी कामावर बहिष्कार टाकणार
रेशन दुकांनदार यांची तहसीलदार यांचां इशारा
सिंदखेड राजा /प्रतिनिधी
रेशन दुकान दार मार्फत दैंनदिन धान्य वाटप व के वाय सी हे ईपॉझ मशीन मार्फत होत असल्याने गेल्या एक महिन्यापासून सर्व्हर व्यवस्थित चालत नसल्याने ग्राहकांना धान्य वाटप व ई के वाय सी काम वेळेवर होत नसल्याने सदर काम शासकीय सेवा केंद्रा मार्फत करण्यात यावे अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने तहसीलदार यांच्या कडे एका निवेदना द्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी आपल्या मागण्या नमुद केल्या आहेत की धान्य वाटप ई पॉश मशीन सर्व्हर च्या येत असल्याने अडचणी , ई के वाय सी चे काम शासकीय सेवा केंद्रा मार्फत करण्याची परवानगी देण्यात यावी , धान्य वितरण कमिशन 10 तारखेच्या आत मिळावे , त्याच बरोबर रेशन दुकान मार्फत दैनदिन धान्य वाटप व ई के वाय सी हे पॉश मशीन मार्फत होत असल्याने गेल्या एक महिन्यापासून सर्व्हर व्यवस्थित चालत नसल्याने ग्राहकांना धान्य वाटप व ई के वाय सी काम चे वेळेवर होत नसल्याने ग्राहक व दुकानदार यांच्या गैरसमज होत आहे .त्याचे रूपांतर शाब्दिक चकमकीत व भांडणात होत आहे ,आणि पर्यायाने रेशन दुकानदारा विरोधात रोष निर्माण होत आहे.याबाबतीत अन्यत्र ठोस मार्ग उपलब्ध करून देण्यात यावा. यामुळे सर्व कामे विना तक्रार करता येईल व असे न झाल्यास ई के वाय सी संदर्भात पर्यायी व्यवस्था म्हणून ई सेवा केंद्र ,सेतू, किंवा सी एस सी सेंटर व अन्यत्र यंत्रणा मार्फत ई के वाय सी करण्याची परवानगी देण्यात यावी ई के वाय सी चे सर्व्हर व्यवस्थित न चालल्यास या कामावर आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील सर्व दुकानदार बहिष्कार टाकू अशा प्रकारचां इशारा स्वस्त दुकानदार संघटनेने तहसीलदार यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे निवेदन देताना तालुका अध्यक्ष उद्धव नागरे , जिल्हा उपाध्यक्ष विलास आसोलकर,,पी.एम.देशमुख,भिकाजी तळेकर,वसंत शेळके,राजू जायभाये,त्रिंबकराव ठाकरे,रवी गायके,तुकाराम जायभाये यांची उपस्थिती होती.