https://vruttamasternews.com/buldhana-news-63/
राष्ट्रीय जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना पासून सैनिकांचा परिवार वंचित
वाकद जहांगीर येथील सरपंच व ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार.
सिंदखेडराजा प्रतिनिधी
सिंदखेड राजा तालुक्यातील वाकद जहांगीर येथील
केशव शिवनी गट ग्रामपंचायतने राष्ट्रीय जल मिशन अंतर्गत येणाऱ्या पाणी पुरवठा नळ योजना पासून देश सेवा करणाऱ्या सैनिकाच्या परिवरास हेतू पुरस्कर वंचित ठेवले आहे,
त्यांना सैनिकांच्या पित्याने विचारणा केली असल्यास सरपंच व ग्रामसेवक यांनी सैनिकाच्या परिवारास उद्धट अरेरावी भाषेचा वापर केला आहे.
राष्ट्रीय जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना गावो गावी राबविण्यात येत असुन या योजने मार्फत गावात, शेतात प्रत्येक गोठ्यावर पाणी पुरवठा ही योजना पोहचत आहे .
भगवान विणकर यांचे सरस्वती बहुउद्देशीय फार्म हाऊस केंद्रीय उद्देम रजिस्टर असून या फार्म हाऊस पासून मुख्य पाण्याची टाकी मात्र १५० ते १७० मीटर अंतरावर आहे.
परंतु मुजोर सरपंच आणि ग्रामसेकांनी दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतातील घराला या नळाची पाईप लाईन फिरवली असून
१५० मीटर अंतरावर असलेल्या सैनिकाच्या परिवारास नळ योजना मार्फत नळ जोडण्यास हेतू पुरस्कर साफ मनाई केली आहे.
उलट त्यांना या बाबत विचारणा केली असता तुम्हाला जे करायचे आहे ते करा अशी धमकी स्वरूप भाषेचा वापर केल्याने
गट विकास अधिकारी सिंदखेड राजा यांना तक्रारी मार्फत सूचना केली असून मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा यांना सुद्धा या प्रकारच्या तक्रारींचे निवेदन दिले आहे
यावर योग्य ती चौकशी व कार्यवाही न झाल्यास सैनिक पित्या कडून उपोषणाचा इशारा मा. जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एका अर्जा द्वारे दिला आहे.
अश्या मुजोर सरपंच व ग्रामसेवक यांच्यार दंडात्मक कार्यवाही कधी होणार व
या ग्रामपंचायत वर कोणाचं नियंत्रण आहे की नाही तसेच ही यंत्रणा मोकाट आहे का हा प्रश्न नागरिकांना
निर्माण झाला आहे.