https://vruttamasternews.com/buldhana-news-64/
वयोवृद्ध, निराधार, विधवा,अपंगाचे प्रकरण मंजूर करून तात्काळ न्याय दया —विजयकांत गवई
चिखली -/सिद्धार्थ पैठने
महाराष्ट्र शासनाची संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना चे रखडलेले प्रकरणे तात्काळ मंजूर करून वयोवृद्ध, निराधार,विधवा व अपंगाना तात्काळ न्याय देण्यात यावे असे तहसीलदार चिखली यांना रिपब्लिकन सेनेच्या निवेदनद्वारे मागणी करण्यात आली आहे.
सविस्तर असे कि चालू वर्ष संपन्याच्या मार्गांवर आले आहे. माहे जानेवारी पर्यंत वयोवृद्ध, निराधार , विधवा व अपंगाचे प्रकरण मंजूर झालेले आहेत सध्या ऑगस्ट महिना सुरु असून अदयाप गेल्या सात महिन्याचे प्रकरण संजय गांधी निराधार विभात पडून आहेत ते प्रकरण बैठक मध्ये घेण्यात आलेले नाही.
सध्या महागाई ने सर्व सामान्यांनसह वयोवृद्ध, निराधार व अपंगा ची कंबर मोडलेली असतांना यांना शासनाची तुटकपुंजी मिळते परंतु ती सुद्धा वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे वयोवृद्ध, निराधार व अपंगाचे प्रलंबित असलेले सर्व प्रकरणे तात्काळ मंजूर करावे व ज्यांचे अनुदान थकीत आहे ते सुद्धा तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करावे अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनद्वारे तहसीलदार चिखली यांना देण्यात आले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष भाई विजकांत गवई,जिल्हा महासचिव सलीम भाई, चिखली शहर उपाध्यक्ष सतीश पवार होते.