https://vruttamasternews.com/buldhana-news-65/
नैनिताल येथे अश्वजित गवई “नॉलेज वेव इंडिया इलाइट परफॉर्मर अवार्ड- 2024″राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
बुलढाणा/प्रतिनिधी
आजचे युग हे डिजिटल युग आहे.इंटरनेट व डिजिटल मोबाईल मुळे जग खुप जवळ आले आहे.आजची तरुणाई मोबाईल सोशल मीडिया च्या विविध साइट च्या अति वापराने वेळ व पैसा सतत खर्च करताना आपणास जाणवते परंतु मोबाइल चा वापर अर्थार्जना साठी होऊ शकतो यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत परन्तु ते शोधता आले पाहिजे व त्याचा वापर करता आला पाहिजे.केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया अंतर्गत देश अधिक प्रभावित झाल्याचे अलिकडच्या काळात जाणवते आहे.
सोशल मीडिया च्या विविध साइट वर पैसे कमविन्याचे मार्ग असताना भारत सरकार मान्यताप्राप्त नॉलेज वेव इंडिया च्या वतीने वयाच्या 20 व्या वर्षी एनिमेशन पदवी चे शिक्षण घेणारा व महिन्याला लाखों रुपये कमऊन अर्न एंड लर्न या कमवा व शिका उक्तिला सार्थ ठरवनारा मेहकर तालुक्यातील दे माली येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा लोर्ड बुद्धा टीवी चे संवाददाता प्रा. गजेंद्र गवई यांचा सुपुत्र अश्वजित गजेंद्र गवई याला उत्तराखंड च्या नैनीताल येथील हॉटेल होको च्या भव्य सभागृहात राष्ट्रीय स्तरावरील “नॉलेज वेव इंडिया इलाइट परफॉर्मर अवॉर्ड- 2024″या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सोशल मीडिया चा वापर करून डिजिटल बिझिनेस मधुन वयाच्या २० वर्षी अश्वजित गजेंद्र गवई हा विद्यार्थी कमवतोय महिन्याला लाखो रुपये व दोन महिन्यांमध्ये ३ लाख पेक्षा जास्त पैसे कमवुन व कोच प्रशिक्षक म्हणून १०० पेक्षा जास्त लोकांना शिकवलं की मोबाईल चा वापर करून तुम्ही कशे पैसे कमवु शकता? कमी दिवसात जास्त प्रमाणात अचीवमेंट केल्याने सदर राष्ट्रीय पुरस्कार अश्वजित गवई यास नॉलेज वेव इंडिया चे संस्थापक हर्ष विकल अल्फा प्रोजेक्ट चे संस्थापक सिझ दीप यांचे हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्कार मिळाल्याने अश्वजित गवई याचे सर्वच स्तरातून अभिनन्दन होत आहे.
आपल्या अभूतपूर्व यशाचे श्रेय अश्वजित आई वडील सुनंदा गजेंद्र गवई, बहिन कुमारी अस्मिता ताई,आजी कौशल्याबाई गवई,रमाबाई जाधव, मामा मामी करुणा सिद्धार्थ जाधव, आरती प्रदीप जाधव यांचे सह गुरुजन वर्ग, मित्र मैत्रीण व सामाजबाँधव यांना देतोय..