https://vruttamasternews.com/buldhana-news-66/
रक्तदाण करताना शासकीय रुग्णलयात करावे – प्रा .डॉ .आंबेकर यांचे प्रतिपादण
महा.अंनिसचा वर्धापदिनानिमित्त रक्तदाण करून आनंदसोहळा
बुलडाणा ता .११ प्रतिनिधी )
रक्तदाण करताना शक्यतो शासकीयच रुग्णलयात करावे जेणेकरून गरीब गरजु रूग्णाला त्याचा फायदा होईल असे प्रतिपादण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मलण समितीचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. संतोष आंबेकर यांनी ( ता .९ ) रोज शुक्रवारला केले . ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलण समितीला ३५ वर्ष पुर्ण झाले त्यानिमित्त जिल्हा रुग्णलयातील रक्तपेढीत बोलत होते . महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलण समितीचे जिल्हाकार्याध्यक्ष प्रदीप हिवाळे यांनी रक्तदाण केल्यानंतर कार्यक्रमाला सुरूवात झाली . यावेळी श्री .आंबेकर म्हणाले की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलण समिती ही ३६व्या वर्षात पर्दापण केले असुन जशी जशी साक्षरता वाढली त्यापेक्षा जास्त अंधश्रध्दा मोठयाप्रमाणात वाढत आहे त्याचे स्वरूप आता बदलत असुन आपल्यावर अधिक जबादारी वाढली आहे . महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलण समितीत युवकानी सहभागी होण्यासाठी पुढे आले पाहीजेत .
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा ३५ वा वर्धापन दिन रक्तदान करून बुलढाणा शाखेच्या वतीने साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाकार्याध्यक्ष प्रदीप हिवाळे ,प्राचार्य मीनलताई आंबेकर कॉम्रेड पंजाबराव गायकवाड, खगोलशास्त्राच्या अभ्यासक अनिल दातीर, पुरुषोत्तम गणगे, संतोष शिंगणे , चव्हाण सिस्टर यांनी शहीद नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले . कार्यक्रमानंतर चहा आणि अल्पोहारचे आयोजण करण्यात आले होते .