https://vruttamasternews.com/buldhana-news-67/
जिल्हा सामान्य रुग्णालया मधील भ्रष्टाचाराची एसीबीने घेतली दखल
महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या पत्रामुळे खळबळ
प्रतिनिधी /राजू भालेराव
देऊळगाव राजा : बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक व इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी मॉड्यूलर ओटी व लेबर रूम तसेच विविध साहित्य सामग्री, उपकराणे खरेदी प्रक्रियेत संबंधित कंत्राटदार कंपनीच्या संगतमताने कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणाची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दखल घेतली असून नुकतेच त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अपर मुख्य सचिव मुंबई यांना एका पत्राद्वारे झालेल्या अपहार व अनियमिततेबाबत तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह २१ अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळून आल्याने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम १७ अ अन्वये लाचलुचपत प्रतिबंधक विभागास पुढील चौकशी आणि गुन्हा दाखल करण्याकरिता सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यता करिता आदेशित केले आहे. एसीबी महासंचालकांच्या या पत्रामुळे जिल्हा आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे कार्यरत जिल्हा शल्य चिकित्सक व इतर जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांनी मॉड्युलर ओटी व लेबर रूम व इतर साहित्य सामुग्री उपकरण च्या खरेदी प्रक्रियेत संबंधित एन एल हेल्थकेअर सोलापूर व ईतर कंत्राटदार यांच्या संगनमताने केलेल्या गैरव्यवहारची चौकशी ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागास उघड तपासणी करण्याबाबत महाराष्ट्र शासन युवा सामाजिक पुरस्कार प्राप्त व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य चंद्रकांत ज्ञानदेव खरात यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे केली होती.सदर प्रकरणात चौकशी अंति प्रस्तुत तक्रार अर्जातील जिल्हा शल्य चिकित्सक तसेच बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी पदीय कर्तव्य करताना तक्रार अर्जात नमूद कामे ही त्यांच्या कार्यकाळात झाल्याचे सिद्ध झाले. तसेच मंजूर कंत्राटदाराकडून औषधाचा व साहित्याचा पुरवठा विविध मुदतीत न केल्यामुळे सदर आदेशातील अटी व शर्ती चा भंग झाला आहे. अशा सर्व कंत्राटदार यांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची तरतूद असताना आजपावेतो तशी कोणतीही कारवाई न करून कर्तव्यात कसूर केल्या चे आढळून आले. दरम्यान भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम १७ अ अन्वये लाच लुचपत प्रतिबंधक विभागास पुढील चौकशी व गुन्हा दाखल करण्याकरिता सार्वजनिक आरोग्य विभागाचे सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेची आवश्यकता असल्याने योग्य त्या चाकोरीतून रीतसरपणे मिळवून देण्याचे निर्देश एसीबी प्रमुख रश्मी शुक्ला यांनी सार्वजनिक आरोग्य विभागातील अपर मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई यांना दिले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोट्यावधींच्या भ्रष्टाचार प्रकरणी एसीबी च्या महासंचालक यांनी पाठविलेल्या पत्रा मुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा हादरली असून श्री खरात यांच्या पाठपुरावा मुळे आता सदर प्रकरणात जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचाऱ्यावर एसीबी आता गोपनीय चौकशी करण्याची शक्यता असून अनेक अधिकारी व कर्मचारी विरुध्द कार्यवाही होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.