https://vruttamasternews.com/buldhana-news-673-2/
अँड.बाळासाहेब आंबेडकर 6 ऑगस्ट बुलढाणा जिल्ह्यात
वंचित बहुजन आघाडीची ओबीसी आरक्षण यात्रा
बुलढाणा :: जिल्ह्यात एससी एसटी ओबीसी च्या न्याय हक्कासाठी लढाई लढण्याकरता वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीने काढण्यात येणाऱ्या आरक्षण बचाव यात्रा 6 ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्ह्यात दाखल होणार आहे सदर आरक्षण बचाव यात्रा सकाळी 11 वाजता मेहकर दुपारी 12:30 वाजता चिखली बुलढाणा 2:00 वाजता धाड 3:30 वाजता जाफराबाद 4:30 वाजता देऊळगाव राजा 5:30 वाजता महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष सविता ताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालयासमोर ओबीसी बांधवांतर्फे सत्कार सिंदखेडराजा सायंकाळी 6:00 वाजता व मुक्काम जालना येथे होणार आहे बुधवारी 7 ऑगस्ट ला छत्रपती संभाजीनगर येथे दुपारी बारा वाजता यात्रेचा समारोप जाहीर सभा होईल तरी देऊळगाव राजा तालुक्यातील नागरिकांनी एससी एसटी ओबीसी च्या लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष उद्धव भाऊ वाकोडे यांनी केले आहे