https://vruttamasternews.com/buldhana-news-698-2/
माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या वर आरोप म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी — मनोज जाधव
चिखली /सिद्धार्थ पैठने
गेल्या चार दिवसापासून चिखली मतदारसंघात जिल्हा काँग्रेस कमिटीने सुरू केलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला उत्तर देण्यासाठी चिखली भाजपाने कुठल्याही गावातील दोन भाजपाचे कार्यकर्ते किंवा ठेकेदार पकडून भाजपाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणाऱ्या राहुल भाऊ बोंद्रे यांच्यावरच आरोप सुरू केले आहेत. हे म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी देणे असे आहे. गेल्या दहा वर्षात राहुल भाऊ आमदार असताना त्यांनी देखील हजारो कोटी रुपयांचा विकास केला पण त्यांनी केलेल्या विकास कामांकडे न बघता फक्त आमच्या ताईंनी काम केले व न भूतो न भविष्याती असे त्यांचे अंध भक्त सांगत आहेत.
सहा महिन्यात दहा वर्षातून होणारे काम होत कसे. एकीकडे जिल्हा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी राजरोसपणे पत्रकार परिषदेत 56 कोटी फक्त एकट्या पाणंद रस्त्याच्या कामाचा भ्रष्टाचार उघडकीस केला आणि या भाजप कार्यकर्त्यांचे व ठेकेदारांचे जणू पित्तच खवळले. एका मागून एक एक जण आपली प्रतिक्रिया द्यायला लागला की दोन्ही तहसीलदारांनी स्पष्टीकरण दिले की अकुशल कामगारांचे पैसे त्यांच्या खात्यात गेले तर मग हा तहसीलदारांनी सांगितलेला खोटा प्रकार नाही का? जर मजुराचे पैसे मजुराच्या खात्यात गेले म्हणजे एका प्रकारे या रस्त्याच्या एकूण इस्टिमेट पैकी 35 ते 40 टक्के निधी वितरित केल्या गेल्याचे एकीकडे तेच त्यांच्या तोंडाने स्पष्ट करत आहेत.
भाजपच्या दबावाला बळी न पडता प्रशासनाने विधानसभेत झालेल्या पानंद रस्ते असो जलजीवर मिशन असो याची चौकशी करावी अशी मागणी करण्यात गैर काय होते ?एकीकडे तर राज्यात व चिखली मतदारघात बीजेपी सरकारच्या काळात सुरू झालेला भ्रष्टाचार उघड करणाऱ्या माजी आमदार तथा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष यांच्यावरच नाना प्रकारे आरोप करणे हे चुकीचे ठरत नाही का ?
मग जर हा आवाज लोकशाहीचा दाबायचा असेल तर भविष्यात लोकशाही राहील का? असा प्रश्न चिखली मतदारसंघात पडलेला आहे. कार्यकर्त्यांनी भाऊला असे सांगितले आहे की भाऊ काहीही झाले तरी मतदारसंघात झालेल्या भ्रष्टाचाराची पाळमूळ आपण जोपर्यंत शोधत नाही व जनतेसमोर हा खोटारडेपणा आणत नाही तोपर्यंत आता जिल्हा काँग्रेस कमिटी शांत बसणार नाही.
यासाठी तळागाळातील व गावातील प्रत्येक कार्यकर्ता हातात काँग्रेसचा झेंडा घेऊन आपल्यासाठी समर्थपणे तयार आहेत.