“
https://vruttamasternews.com/buldhana-news-7/
चिखली / सिद्धार्थ पैठणे
अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांनी तात्काळ केवायसी करावी”
-तहसीलदार चिखली यांचे आवाहन
चिखली /सिद्धार्थ पैठणे
चिखली तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की ऑक्टोबर 20 22 अतिवृष्टीमुळे तसेच ऑक्टोबर 20 22 मधील सततचा पावसामुळे तसेच नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पावसामुळे शेतकऱ्याच्या शेतीचे नुकसान झाले आहे शासनामार्फत अनुदान वाटप करण्यासाठी कॅम्प चे आयोजन केले आहे सेतू केंद्रावर दिनांक 25/5/2024 26/ 5 /24 व 27/5/2024रोजी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे तरी ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतला जाऊन तसेच शहरी भागातील शेतकऱ्यांनी चिखली शहरातील सेतू सुविधा केंद्रावर जाऊन प्रलंबित ही केवायसी प्राधान्याने करून घ्यावी असे एका पत्राद्वारे तहसीलदार चिखली यांनी कळविले आहे