Buldhana news जलसंधारण विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या सर्वेने शेतामध्ये लाखोचे नुकसान! मनुबाई येथील शेतकरी महिला आमरण उपोषणावर ठाम!

https://vruttamasternews.com/buldhana-news-70/

जलसंधारण विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या सर्वेने शेतामध्ये लाखोचे नुकसान!

 

मनुबाई येथील शेतकरी महिला आमरण उपोषणावर ठाम!

 

कैलास आंधळे/ मेरा बुद्रुक

 

चिखली तालुक्यातील मनुबाई येथील महिला शेतकरी विमल वायाळ यांच्या शेतामध्ये जलसंधारण विभाग यांनी त्यांची कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या खडका शिवारामधील गट नंबर २ मध्ये ३ हेक्टर ४६ आर ह्या शेतामध्ये सिमेंट बंधारा बांधून,३०० ते ४०० फूट नाला खोदून त्यांच्या शेतामधील वडिलोपार्जित असलेले जांभळीचे पाच झाडे संबंधित विभागाने तोडून त्याची विल्हेवाट लावली महिला शेतकरी यांनी या सर्व गोष्टीची माहिती घेतली असता त्यांनी जलसंधारणचे कार्यालय देऊळगाव राजा यांना वेळोवेळी निवेदनाद्वारे पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांच्या शेतामध्ये झालेले नुकसान भरपाई न मिळाल्याने त्यांनी दिनांक ७ ऑगस्ट रोजी उपविभागीय जलसंधारण उपविभाग देऊळगाव राजा यांच्याकडे मनुबाई येथील महिला शेतकरी विमल विनायक वायाळ वय ६७ वर्ष यांनी निवेदन दिले त्या निवेदनात त्यांनी त्यांच्या शेतामधील विनापरवानगीने शेतातमधे नालाखोदून,वडिलोपार्जित जांभळीचे पाच झाडे तोडून त्याची विल्हेवाट लावून तथा शेतातील पिकाचे अतोनात नुकसान केल्यामुळे भरपाई मिळण्यासाठी संबंधित विभागाकडे निवेदन देऊन त्या निवेदनात महिला शेतकरी यांनी १० दिवसांमध्ये नुकसान भरपाई न मिळाल्यास दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोजी उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे.महिला शेतकरी यांनी ह्या निवेदनाच्या प्रतिलिपी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,जिल्हाधिकारी बुलढाणा,कार्यकारी अभियंता जयसंधारण विभाग बुलढाणा,मा.तहसीलदार साहेब देऊळगाव राजा,मा.पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय देऊळगाव राजा,पोलीस स्टेशन अंढेरा,पोलीस स्टेशन देऊळगाव राजा यांना माहिस्तव सादर केली आहे.

 

जलसंधारण विभागाचे अधिकारी,कर्मचारी यांनी खडका शिवारामध्ये माझ्या मालकीचे गट नंबर २ मधील ३ हेक्टर ४६ आर मध्ये चुकीचा सर्वे करून माझ्या शेतामधील तीनशे ते चारशे फूट नाला सरळीकरण करून त्यावर सिमेंट बंधारा बांधला सिमेंट बंधारा बांधत असताना माझ्या शेतामध्ये असलेले वडिलोपार्जित ५ जांभळी चे झाडे त्यांनी तोडून त्याची विल्हेवाट लावली.

झालेल्या नुकसानाची भरपाईसाठी मी दिनांक २० ऑगस्ट पासून उपविभागीय जलसंधारण अधिकारी देऊळगाव राजा यांच्या कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *