https://vruttamasternews.com/buldhana-news-705-2/
आझाद समाज पार्टी खामगाव तालुका अध्यक्षपदी भाई मयूर खंडारे यांची निवड….
बुलढाणा / प्रतिनिधी
संपूर्ण देशभरात खासदार चंद्रशेखर आझाद(रावण)यांच्या नेतृत्वाचा व कर्तुत्वाचा ठसा उमटत असताना देशातील प्रत्येक तरुण हा भाई चंद्रशेखर आजाद(रावण)यांना आपले आदर्श नेतृत्व म्हणून पाहत आहे. यावेळी दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी खामगाव तालुक्या मध्ये आझाद समाज पार्टी (कांशीराम भीम आर्मी) चा कार्यकर्ता पदग्रहण सोहळा पार पाडला यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते .तर बहुसंख्या कार्यकर्त्यांनी आझाद समाज पार्टी मध्ये प्रवेश घेऊन भाई चंद्रशेखर आझाद (रावण)यांचे हात बळकट करण्याचा निश्चय केला. तर या कार्यक्रमाच्या वेळी खामगाव तालुका अध्यक्ष म्हणून तरुण तडफदार युवा नेतृत्व भाई मयूर खंडारे यांची जिल्हाध्यक्ष भाई सिद्धांत वानखेडे यांच्या नेतृत्वात नियुक्ती करण्यात आली. व बहुसंख्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आझाद समाज पार्टी मध्ये पक्षप्रवेश घेण्याचा निश्चय केला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीतील नेते ज्ञानेश्वर जी काकडे व जिल्हा कार्यकारणी सदस्य राहुलजी शिरसाट व आझाद समाज पार्टी (भीम आर्मी) खामगांव चे गणेश बघेल, आकाश सोनोने, मयुर वाकोडे, शिवकुमार ढेकळे, विशाल यादव, रवी निंबाळकर, धीरज मानकर, नितीन खरात,रमेश मोरे, सुनिल वाकोडे,नवल वानखेडे, अभिजित देशमुख, बाळु उगले, सोनु खोडके, अशिफ अन्सारी,राजा अन्सारी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.