रिपाई च्या मेहकर येथील कार्यक्रमास अत्यल्प प्रतिसाद

https://vruttamasternews.com/buldhana-news-733-2/

रि पा ई कार्यक्रमात मेहकरात संथ प्रतिसाद

मेहकर /सिद्धार्थ पैठने

लोकसभेचे पडघम वाजले विधानसभेच्या उमेदवारांची लगीन घाई सुरू झाली विधानसभेच्या निवडणुकांसाठी राज्यात गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या उमेदवारांनी चांगला चंग बांधला आहे,डॉ मा राजरत्न आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मूळ पक्षाची स्थापना केली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर रिपब्लिकन चळवळीचं जाळ उभ करण्याचा निर्धार केला. गेल्या कित्येक दिवसापासून ते रिपब्लिकन चळवळीसाठी झटताना दिसत आहेत सर्वसामान्यांना गोरगरिबांना राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय दृष्ट्या न्याय मिळावा यासाठी ते झगडत असतातच म्हणून सर्व भारतीयांच्या मनामनात त्यांच्या विषयी ठसा उमटलेला आहे एन पावसाळ्यात सुद्धा निवडणुकीचे वातावरण तापताना दिसत आहे. एकीकडे गेल्या आठ-दहा दिवसापूर्वी नवीन मूळ रि पा ई चि स्थापना केली म्हणून आता नव्याने होऊ घातलेल्या विधानसभेसाठी जिल्ह्यात डॉ राजरत्न आंबेडकर यांच्या रिपाई कडून घोषणा केल्या गेली परंतु जिल्ह्यात होऊ घातलेला पहिलाच कार्यक्रम मेहेकारात यशस्वी न झाल्याची चर्चा जिल्ह्यात होत आहे महाराष्ट्राचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश सचिव यासारखे महत्त्वाचे एकूण तीन दिग्गज नेते शहरात येतात आणि अपुरी जनसंख्या पाहून सामान्यांच्या मनात प्रश्न सहाजिकच आहे? त्यामुळे आज दिनांक 14 8 20 24 रोजी झालेली सभा अ यशस्वीच म्हणावी लागेल किंवा याला कारणे हे तसेच की आयोजकांनी जाहीर केलेले पद वाटपाचे कार्यक्रम सुद्धा सदर कार्यक्रमात होऊ शकले नसल्याने सामान्य जनता नाराजीचा सूर उमटवत आहेत एकीकडे पक्षाला बळकटी मिळत असताना जर असे वातावरण घडत राहिले तर पक्षाला बाळकडू येण्या अगोदरच पक्ष कुठेतरी थांबल्याची चर्चा होईल असे सर्वसामान्याच्या मनातून उमटत आहेत सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा जिल्हा बुलढाणा येथून विविध पक्षाचे कार्यकर्ते नेते उपस्थित होते त्यांनी मान्यवर महाराष्ट्र अध्यक्ष यांचे स्वागत केले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक आयोजकांनी सहकार्य केल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *