https://vruttamasternews.com/buldhana-news-772-2/
मोताळा तालुक्यातील तरोडा ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे तरोडा गावात घाणीचे साम्राज्य पसरुन गावातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात.
ग्रामपंचायत कार्यालय तरोडा निष्काळजी पणा
भाई कोलते मोताळा तालुका अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना.यांची मागणी
मोताळा/ प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसापासून मोताळा तालुक्यातील तरोडा या गावांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामध्ये शाळा, गावातील मेन रस्ते, अंगणवाडी, गावातील सार्वजनिक ठिकाणी पाणी भरल्या जाते ते म्हणजे हाफशी हातपंप,गावातील शाळा , अंगणवाडी दलित वस्ती,अशा महत्त्वाच्या ठिकाणी पाणी साचलेले आहे त्यामुळे गावातील मुलांचे व नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
परंतु याकडे ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक तसेच शासनाचे कुठलेही लक्ष नसुन हेतुपुरस्सर याकडे दुर्लक्ष केले जात आहे या संदर्भात वेळोवेळी मोताळा तालुका अध्यक्ष प्रल्हाद भाई कोलते ऑल इंडिया पॅंथर सेना यांच्या माध्यमातून वेळोवेळी फोन द्वारे प्रत्यक्ष भेटून व निवेदनाद्वारे माहीती दिली परंतु आतापर्यंत कुठलीही दखल घेतली नाही. ही तरोडा गावची ग्रामपंचायत व प्रशासकीय अधिकारी गावातील लोकांच्या जीवाशी खेळत आहे गावातील अंगणवाडीमध्ये लहान लहान मुलं शिकत आहे व गावातील शाळेमध्ये सुद्धा मुलं शिकत आहे त्यांच्या अवतीभोवती अतिशय घाणीचे साम्राज्य पसरलेले असून त्या घाणीमुळे गावातील मुलांचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांना अनेक रोगांच्या साथींना सामोरे जाऊन गंभीर स्वरूपाचे आजार उद्भवू शकतात त्यामुळे गावातील नागरिकांचे व मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यांचे काही बरे वाईट झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच व बीडीओ राहील याची नोंद घ्यावी येणाऱ्या आठ दिवसांमध्ये तरोडा ग्रामपंचायत अंतर्गत गावातील घाणीचे साम्राज्य नष्ट न झाल्यास आठ दिवसानंतर तरोडा ग्रामपंचायत यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.