https://vruttamasternews.com/buldhana-news-8/
सिंदखेड राजा तालुक्यात वन्य प्राण्यांच्या हल्यात बोगस लाभार्थी दाखवून मिळविली मदत
संबंधित जबाबदार अधिकारी कर्मचारी यानी केली शासनाची फसवणूक
सिंदखेड राजा/ प्रतींनीधी
सन 2022 ते 2024 या कालावधीत वन्य प्राण्यांच्या हल्यात काही बोगस जखमी व्यक्ती दाखवून मदतीत आर्थिक गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी होऊन संबंधितावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी रामदास काहाळे यांनी उपवन संरक्षक यांच्या कडे केली आहे
वन विभागा मार्फत सन 2022ते 2024 या कालावधी मध्ये सिंदखेड राजा विभागात वन्य प्राण्यांच्या हल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना मदत देण्यात आली मात्र या मदतीत काही बोगस व्यक्ती दाखवून वन्य प्राण्यांच्या हल्यात जखमी दाखविले आणि त्यांच्या नावावर मदत लुटण्याचे काम पंचनामा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी केले आहे . मदत देण्यासाठी चुकीचा पंचनामा अधिकारी कर्मचारी यांच्या कडून करण्यात आला असून कायमचे अपंगत्व आल्याचे दाखविण्यात आले आहे त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबधित अधिकारी कर्मचारी यांच्या वर निलंबनाची कारवाई करण्यात येवून सेवेतून निलंबित करण्यात यावे अशा प्रकारची तक्रार रामदास कहाळे यांनी उपवनसंरक्षक यांच्या कडे केली आहे