https://vruttamasternews.com/buldhana-news-80/
वर्दडी बू येथील जिल्हा परिषद शाळेतील आरोपी खुशाल उगले यास 28 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी
सिंदखेड राजा/ प्रतिनिधी
आपल्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थिनीचा वारंवार विनयभंग करून शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा शिक्षक हुशार उगले हा अटकेच्या भीतीने गावातील गुरांच्या गोठ्यात लपून बसला होता याची माहिती किनगावराजा पोलिसांना मिळतात 23 ऑगस्ट च्या रात्री आठ वाजता पोलिसांनी आरोपी शिक्षकास गोठ्यातून ताब्यात घेतले शिक्षक खुशाल उगले यास 24 ऑगस्ट रोजी मेहकर येथील जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 28 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे
विद्यार्थिनीच्या पालकांसह विद्यार्थ्यांनी 23 ऑगस्ट रोजी शुक्रवार किनगाव राजा पोलीस स्टेशन काठून मुली सोबत झालेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली घटनेचे गांभीर्य पाहता उपविभागी पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी किनगाव राजा येथे पोहोचून पिडीत अल्पवयीन विद्यार्थ्यांनीचे जबाब नोंदविले संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर एका दहा वर्षे विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षक खुशाल उगले व 56 राहणार पांगरी उगले मुक्काम किनगाव राजा यांच्या विरोधात पोस्को व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा व इतर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान गुन्हा दाखल झाल्याने अटकेच्या भीतीने आरोपी फरार झाला होता त्यामुळे त्याला अटक करणे पोलिसा पुढे मोठे आव्हान होते. अशातच पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की आरोपी हा गावातील एका जनावरांच्या गोठ्यात लपून बसला आहे यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता आरोपी खुशाल पणे गोठ्यात लपून बसलेला दिसून आला तेथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 24 ऑगस्ट रोजी सदर आरोपीस मेहकर येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी शिक्षकास 28 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे