https://vruttamasternews.com/buldhana-news-82/
वंजारी महासंघाकडून ज्ञानेश्वर बुधवत यांना राष्ट्रसंत भगवान बाबा समाज प्रबोधन महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान
सिंदखेड राजा :- वंजारी महासंघाचे दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन दिनांक २५ ऑगस्ट रोजी गंगा लॉन्स राष्ट्रसंत भगवानबाबा चौक निर्मल नगर अहमदनगर येथे नुकतेच उत्साहात संप्पन्न झाले.या संमेलनासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून प्रा.डॉ. सांगिता घुगे तर उद्घाटक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप, मावळते अध्यक्ष प्रा. वा. ना. आंधळे हे उपस्थित होते. वंजारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष विचारवंत गणेशजी खाडे,स्वागताध्यक्ष म्हणून आंतरराष्ट्रीय कुस्ती पटू राजकुमार आघाव तर सहस्वागताध्यक्ष रेणुका वराडे अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.या संमेलनात दैनिक लोकनेताचे संपादक, ज्ञानेश्वर बुधवत यांना राष्ट्रसंत भगवान बाबा साहित्यरत्न पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला.
ज्ञानेश्वर बुधवत मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील सावखेड तेजन या खेडे गावातले असून ज्ञानेश्वर बुधवत यांच्या निर्भिड व निःपक्षपाती पत्रकारिता या सर्व कामाची दखल घेऊन वंजारी महासंघ महाराष्ट्र यांच्या मार्फत ‘ राष्ट्रसंत भगवान बाबा साहित्यरत्न पुरस्कार २०२४ ‘ लेखक, संपादक ज्ञानेश्वर बुधवत यांना नुकताच प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे ज्ञानेश्वर बुधवत यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
चौकट
केलेला गौरव हा केवळ माझा नसून मला घडवणारे प. पू. बाबा, माझ्या सोबत नेहमी एकमत राहून मला बघून घेऊ काय ते, अशी रोखठोक भूमिका घेणारे नेहमी सोबत असणारे माझे बंधू ज्ञानेश्वरजी मुंढे, मला नेहमी कुठेही जाण्यासाठी कधीही नाही म्हणारा माझा परिवार माझे आई वडील आजी भाऊ, व परिवारातील सर्व, पुरस्कार ज्या व्यासपीठांमुळे मिळाला तो दैनिक लोकनेता परिवार ज्यांनी नेहमी आपल्या संपादकाला आणि पेपर महाराष्ट्र भर पोहचवण्यासाठी प्रयत्न केलेत. त्यानंतर महत्वाचे नाव जे केवळ एक रसिक म्हणून, आपल्या मित्राला मिळत असलेल्या पुरस्कार एकट्याने काय घ्यावा म्हणून कोणी तरी 2 मित्र सोबत पाहिजे म्हणजे त्यांनी गावात जाऊन सांगितले पाहिजे की इतका चांगला सत्कार झाला म्हणून, तब्बल पावणे ३०० किमी आलेले माझे गुरुवर्य मार्गदर्शक तथा लोकनेता चे मानद सल्लागार ॲड. विजयकुमार कस्तुरे साहेब चिखलीकर,कलाकार बबनराव महमुने व अंकुशराव पडघान, व मला शाळेय जीवनापासून योग्य मार्गदर्शन करत आलेले. प्रा. संदीप सर ज्यांनी मला नेहमी छोटाभावा प्रमाणे मार्गदर्शन केले. आणि… जीवन जगत असतांना आयुष्याचे जे साथीदार वेगवेगळ्या क्षेत्रातून आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळत गेले तो मित्रपरिवार व इतर सर्व आदी. मान्यवर या सर्वांचे मनःपुर्वक आभार व्यक्त करून सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो. असे प्रतिपादन संपादक बुधवत यांनी माध्यमांशी बोलतांना केले.