देऊळगाव राजा/ राजु भालेराव उपोषणाचा दुसरा दिवस, आज कलेक्टर यांच्या आदेशानुसार तहसीलदार व तलाठी कर्मचारी तहसील कर्मचारी उपोषण स्थळी दाखल झाले असता, जानेवारी 2024 मध्ये नेमलेले अधिकारी यामध्ये तहसील चे कर्मचारी घेतले होते, त्यांचे अहवाल बघितले असता, ग्रामसेवक यांनी दिलेल्या अहवाल ला मिळत नसल्याने, व तलाठी यांना समिती मध्ये मिटिंग कधी झालीच नाही, आणि तहसील कर्मचारी यांना समिती नेमल्या नंत्तर कधी विस्वासात घेतलेच नाही, असे तहसील कर्मचारी व समिती मध्ये नेमलेले कर्मचारी यांनी कळवले,म्हणजे उपोषण फक्त नावापुरत सोडल आणि नावापुर्ती समिती नेमली का असा प्रश्न उपोषण कर्ते यांनी नायब तहसीलदार मॅडम यांना विचारले. पंचायत समिती मधील कुठलाही अधिकारी किंवा ग्रामसेवक यांनी उपोषण स्तळी आले नाही पण एक कर्तव्य म्हंणून तरी तहसीलदार यांचे कर्मचारी आले. त्यामुळे डोईफोडे साहेब यांनी त्यांचे धन्यवाद मानले