सिंदखेड राजा/ प्रतिनिधी मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला आहे. केवळ 8 महिन्यात हा पुतळा पडतोय हे अनाकलनिय आहे .मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करताना अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही .या दुर्घटनेचा जाहीर निषेध करून आज दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मुक आंदोलन करन्यात येणार आहे. या प्रकरणात जे जे कोणी दोषी असतील त्यांच्या विरोधात अत्यंत कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी याचबरोबर सरकारने अहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावरून युगपुरुष भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि दैदीप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा पुन्हा उभा करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने सिंदखेडराजा येथे तहसीलदार सिंदखेडराजां याच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे यावेळी तालुकाध्यक्ष जगनराव सहाने. माजी सभापती . शिवाजीराजे जाधव, माजी नगराध्यक्ष सिताराम चौधरी, शहराध्यक्ष युवक आघाडी आरेफ चौधरी, नारायण किंगरे, आत्माराम कायदे ,श्याम मेहेत्रे यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी निवेदन दिले
Offcanvas menu