सिंदखेडराजा/प्रतिनिधी – मराठा सेवा संघाचा ३४ व वर्धापन दिन दि.१ सप्टेंबर रोजी असून त्या निमित्ताने जिजामाता हाॅस्पिटल व महिला आरोग्य केंद्र सिंदखेडराजा येथे दि.३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच शिबीरामध्ये निवड झालेल्या रुग्णांची मोतिबिंदू व डोळ्यावरच्या पडद्याची शस्त्रक्रिया ही अल्प दरात करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
