बोराखडी बावरा महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष पदी समाज भूषण गोल्डन भाई दिलीप जी खरात यांची बिनविरोध निवड

देऊळगाव राजा / प्रतिनिधी  तालुक्यातील बोरखेडी बावरा या गावची ग्रामसभा आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच निर्मलाताई खरात यांच्या अध्यक्षतेखाली पार असली असून या मध्ये सामाजिक बांधिलकी असलेले भाई दिलीप खरात यांची  महात्मा गांधी तंटा मुक्त समिती अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

भाई दिलीप खरात हे जरी बोराखेडी बावरा या गावचे असले तरी बुलढाणा जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळी चे नेते असून समजासाठी सातत्याने अग्रेसर राहून काम करत असतात याचं कामाची दखल घेवून गावातील नागरिकांनी त्यांची तंटा मुक्त समिती अध्यक्ष पदी निवड करून जिल्ह्यात काम करणाऱ्या माणसाचा तंटा मुक्त समिती अध्यक्ष पद देवून जिल्हा बरोबर गावची सुद्धा जबाबदारी दिली आहे.सरपंच निर्मला ताई खरात , राहूल खरात सरपंच चिरंजीव  , शरद खरात ,सुधाकर खरात ,गणेश शेरे मामा ,संतोष शेरे, ग्रामसेवक अशोक ठाकरे , वसंत सुतार , सारंग म्हस्के , विकास खरात ,गौतम खरात ,राजू शेरे, लीबाजी शेरे, देशमुख सर, पोलीस पठाण साहेब ,यावेळी खरात शेरे परिवार हजर होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *