महाराष्ट्रात वाढत्या महिला अत्याचाराबाबत कठोरात कठोर कायदा करून आरोपींना कडक शासन करा – ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे जिल्हा सचिव राजेंद्र मोरे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

बुलढाणा /सचिन खंडारे महाराष्ट्र मध्ये महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे त्याचबरोबर मुलीवर सुद्धा अत्याचार मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राहिली की नाही असा प्रश्न निर्माण होत असून महिलांची सुरक्षितता मजबूत व दोषी असणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावे असे मागणे ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दादासाहेब केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे निवेदन देण्यात आले, ३० ऑगस्ट रोजी सदर तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले असून निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की सध्या घडलेल्या घटनेमुळे महिलांच्या मनामध्ये मुलींच्या मनामध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे महिला काम करण्याकरता कुठेही जात नसून सरकारने बस स्थानक होस्टेल इतर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावे त्याचबरोबर अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी कठोरात कठोर कायदा करून आरोपींना कडक शासन करावे अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली,यावेळी निवेदन देताना ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे विदर्भ उपाध्यक्ष सचिन खंडारे,ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे जिल्हा सचिव राजेंद्र मोरे,ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष बबन सरकटे आधी यावेळी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *