सिंदखेड राजा /प्रतिनिधी परिषद शाळेतील विद्यार्थीनी चां विनयभंग करणाऱ्या शिक्षकास फाशीची शिक्षा द्या
अपंग परंतु जिद्दी युवक अक्षय भैया दराडे यांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे मागणी
सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी बु येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थीनी सोबत शाळेतील वर्ग शिक्षक खुशाल उगले हा एक वर्षापासून विद्यार्थीनी सोबत लैंगिक छळ करत असल्याने सदर शिक्षका विरोधात किनगाव राजा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याच अनुषंगाने तालुक्या सह जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून या पार्श्वभूमीवर हनवतखेड येथील एक अपंग युवक अक्षय भैया दराडे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्या आरोपी शिक्षकाला फाशी ची शिक्षा व्हावी यासाठी निवेदन देवून मागणी केली आहे.