सुनिल अंभोरे/ जिल्हा प्रतिनिधी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष मा .दादाभाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच राष्ट्रीय सचिव अविनाश झोटिंग यांच्या सूचनेनुसार मा. शिक्षणाधिकारी बुलढाणा यांना “ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. गंगाराम उबाळे व विदर्भ मुख्य संघटक सुनिल अंभोरे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना ग्राहकांचे हक्क, कर्तव्य व ग्राहकांच्या हितासंबंधी जनजागृती करण्यासाठी अनुमती मिळणे बाबत मा. शिक्षणाधिकारी साहेब बुलढाणा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून त्यांना विनंती अर्ज देण्यात आला.मा. शिक्षणाधिकारी साहेब बुलढाणा यांनी सुद्धा सकारात्मक चर्चा केली. विद्यार्थी दशेत जर विद्यार्थ्यांना ग्राहकांच्या हक्क,कर्तव्याबद्दल, माहिती दिली तर ते उद्याचे भावी सुज्ञ ग्राहक, नागरिक राहतील. व ते सुद्धा इतरांना जागृत करतील हा या मागचा ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचा मुख्य उद्देश आहे. यावेळी यांच्यासोबत ज्येष्ठ पत्रकार कैलास आंधळे हे सुद्धा उपस्थित होते.
Offcanvas menu