https://vruttamasternews.com/buldhana-news-9/
तक्तालिन जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या कडून शेतकऱ्यांची तूर हरबऱ्या ची रक्कम वसूल करा
चौकशी अहवालात दोषी असूनही कारवाई नाही
बुलढाणा /प्रतिनिधी
तत्कालीन जिल्हा मार्केटिंग अधिकारी व केंद्रप्रमुख यांनी कर्तव्यात कसूर करून तुर हरभरा घोटाळा झाल्या प्रकरणी एकूण 45 लाख 80 हजार 263 रुपये रकमेचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांचे विरोधात कारवाई करून झालेल्या अपहाराची रक्कम वसूल करून शासकीय सेवेतून निलंबित करण्यात यावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे रामदास कहाळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की सन 2017/18 मध्ये नाफेडमार्फत खरेदी विक्री संघ सिंदखेड राजा यांनी शेतकऱ्याकडून तुर हरभरा मूग उडीद खरेदी केला होता या संदर्भात फसवणूक झालेल्या शेतकऱ्याकडून खरेदी केलेला माल सन 2017– 18 मध्ये जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा यांनी नेमलेल्या चौकशी समितीने दिलेल्या चौकशी अहवालात जिल्हा मार्केटिंग अधिकारी व केंद्रावरील केंद्रप्रमुख यांचा सुद्धा गैरव्यवहारात प्रकरणात संबंध असल्याने व करारनाम्यातील अटी क्रमांक 11 व 15 चे पालन न केल्याने कर्तव्यात कसूर केली व जबाबदारी पार पाडली नाही त्यामुळे केंद्रावर झालेल्या शेतकऱ्यांच्या मालाचे क्विंटनुसार रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे हरभरा खरेदीमध्ये 28 लाख 17 हजार 188 व तुर खरेदीमध्ये 17 लाख 63 हजार 75 रुपये अपहार झालेला आहे या संपूर्ण बाबीस जिल्हा मार्केटिंग अधिकारी व केंद्रावरील केंद्रप्रमुख एकत्रित गैरव्यप्रकरणी समान भागीदार असल्याने त्यांचे विरुद्ध फौजदारी कारवाई अपेक्षित असताना जाणून-बुजून सदर प्रकरणातून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे त्यांचे विरुद्ध अनियमितता व एकूण रक्कम 45 लाख 80 हजार 273 एवढ्या रकमेचा गैरव्यवहार केला असल्याचे चौकशी अहवालामध्ये स्पष्ट झालेले असताना सुद्धा अनेक शेतकऱ्यांचे व शासनाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीस तत्कालीन जिल्हा मार्केटिंग अधिकारी बुलढाणा व केंद्रप्रमुख गैरव्यवहारात आर्थिक बाबीशी निगडित दोषी असल्याने त्यांचे विरुद्ध फौजदारी कारवाई होणे गरजेचे आहे व कथीत गैरव्यवहारात गरीब शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानाची रक्कम यांचे कडून वसूल करून त्यांना सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी तक्रार रामदास कहाळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे