सिंदखेड राजा/प्रतिनिधी सन 2024 या वर्षीचा भारतीय वंचित जनसंसद आणि वृंदावन फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने दिला जाणारा अत्यंत मानाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने विनोद ठाकरे, मातृतिर्थ सिंदखेड राजा यांना सन्मानित करण्यात आले.
सावित्रीबाई फुले विद्यापीठा तील सभागृहात संपन्न झालेल्या या सोहळ्याला 91व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ लक्ष्मीकांत देशमुख, जेष्ठ सामाजिक नेते डॉ अंबादास सगट आणि प्रणिता राठी यांच्या हस्ते या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी संत चोखामेळा अभ्यासन केंद्र महाराष्ट्र राज्याचे संयोजक सचिन पाटील, 2ऱ्या संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ मिसाळ आणि स्वागताध्यक्ष संतोष तांबे व सावित्रीबाई विदयापीठाचे डॉ विनोद सूर्यवंशी यांच्या सह शिक्षण, अध्यात्म आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते!