देऊळगावराजा हायस्कूलचा मुलींचा खो-खो संघ तालुकास्तरावर अव्वल
देऊळगाव राजा\ प्रतिनिधी देऊळगाव राजा हायस्कूल येथे तालुकास्तरीय खोखो क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तालुक्यातील सर्व शाळांचे खोखो संघ सहभागी झाले होते दिनांक 28 ऑगस्ट रोजी मुलांचे संघ तर 29 ऑगस्ट रोजी मुलींचे संघ सहभागी झाले होते. यामध्ये देऊळगावराजा हायस्कूलच्या 17 वर्षे वयोगटातील विद्यार्थिनींनी खो-खो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल देऊळगाव राजा शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांनीचे अभिनंदन करून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुख्याध्यापक आर बी कोल्हे पर्यवेक्षक डी व्ही जाधव, क्रीडाशिक्षक एस व्ही मुळे, हर्षल साळवे, अंबादास खरात, रामदास गुरव आदींची उपस्थिती होती