अप्पर पोलिस अधीक्षक बी . महामुनी यांची वर्दडी जि . प . शाळेला भेट.

बुलढाणा /सचिन खंडारे गावकऱ्यांनी संविधानाक पद्धतीने विषयाला हाताळून शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.

येथिल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत २३ ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलींवर एका शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली त्यांनतर जिल्ह्यात या घटनेने मोठी खळबळ उडाली गेली चार दिवसांपासून पोलिस येथे तळ ठोकून आहेत.आज २७ ऑगस्ट रोजी शाळेला अप्पर पोलिस अधीक्षक महामुनी, पोलिस उपविभागीय अधिकारी मनिषा कदम, ठाणेदार विनोद नरवाडे, यांनी शाळेला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधत होते . संवाद साधताना अ. पो. अधीक्षक बी.बी.महामुनी बोलत होते. यावेळी संबंधित केंद्र प्रमुख यांना बोलतांना केंद्रा अंतर्गत असलेल्या शाळेत महिला शिक्षिका कमी असल्या बाबत खंत व्यक्त करून वरिष्ठांना याबाबत सांगुन महिला शिक्षिकांची संख्या वाढवावी अशा सुचना दिल्या व मी सुद्धा शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी जमंग यांचेशी बोलणार असल्याचे सांगितले, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांना यापुढे जातीने लक्ष घालून आपण विद्यार्थ्यांची अडचणी जाणून त्या दुर करा व वेळोवेळी शाळा व्यवस्थापन समिती सोबत बैठक घेऊन शाळेबाबत सकारात्मक निर्णय घ्या. यावेळी पिडित विद्यार्थ्यांच्या वर्गात भेट देऊन पोलिस तुमच्या सोबत आहेत. अन्याय सहन करू नका. गावकऱ्यांनी अशांतता पसरविण्याचे काम करणाऱ्या लोकांपासून सावध रहा अशाही यावेळी गावकऱ्यांना सुचना दिल्या. यावेळी सरपंच पुष्पाबाई इनकर, सचिव के.एल. शिंगने, उपसरपंच रविंद्र नागरे, सर्व ग्राम पंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, केंद्र प्रमुख विलास आघाव, मुख्याध्यापक आसाराम मांजरे, सर्व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

ग्रामस्थांनी शाळेच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज असुन त्यासाठी आम्ही गावकरी लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची तयारी करीत आहेत. असे सांगितल्यावर अप्पर पोलिस अधीक्षक महामुनी यांनी माझ्या कडून सुध्दा यासाठी १०००० रूपये योगदान देणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *