नातवा सोबत खंडोबाच्या दर्शनाकरता जाणाऱ्या महिलेला चाकूचा धाक दाखवत अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने चोरट्याने लुटले ।

बुलढाणा /सचिन खंडारे संपूर्ण महाराष्ट्रात महिला वरील होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात रान पेटले असताना,

महिला खरोखरच किती सुरक्षित आहे याची प्रचिती १ सप्टेंबर रोजी सिंदखेडराजा येथे आली आहे,सविस्तर वृत्तांत असा की राजवाडा परिसरात राहणाऱ्या सिंदखेडराजा येथील श्रीमती सुमनबाई छबुराव मेहेत्रे वय ५० वर्षे ह्या १ सप्टेंबर रोजी आपल्या नातवाला सोबत घेऊन गावातीलच खंडोबा मंदिरामध्ये सकाळी साडेसहा वाजे दरम्यान दर्शनाकरता जात असताना रामप्रसाद ठाकरे यांच्या शेताजवळ मोटरसायकलवर दोन अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्याला चाकू लावला व जर तु आरडाओरडा केला तर ठार मारू अशी धमकी दिली , महिला नातवासोबत असल्यामुळे प्रचंड घाबरली होती सकाळी ढगाळ वातावरण असल्यामुळे तसेच रस्त्याने वर्दळ नव्हती,तेव्हा चोरट्याने महिलेच्या अंगावरील जबरदस्तीने सोन्या चांदीचे दागिने हिसकाहून घेतले ,यामध्ये महिलेच्या हातामध्ये असलेले जुने वापरात चांदीचे कडे,फाटल्या अंदाजे वजन ५०० ग्रॅम कि १५०००,कानातील सोन्याचे फुल दोन वजन दोन ग्रॅम कि ६०००,गळ्यातील सोन्याची पोनाडी पोत वजन १० ग्रॅम किं . २०, ००० असा एकूण ४१, ००० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी दिवसाढवळ्या महिलेच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने दिल्यामुळे सिंदखेडराजांमध्ये एकच खळबळ उडाली आहे,याबाबतश्रीमती सुमनबाई मेहत्रे यांनी सिंदखेडराजा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात दोन चोरट्याविरुद्ध कलम 309 (4) 351, (3 ) ( 5 ) BNS नुसार गुन्हा दाखल केला आहे,पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक सानप हे करत आहेत,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *