तलाठी बी. बी. गिरी यांचा उपविभागीय यांच्या कडून गौरव मनसेच्या वतीने केला सत्कार

सिंदखेडराजा/ रामदास कहाळे तालुक्यातील आडगाव राजा तथा सिंदखेड राजा येथे कार्यरत तलाठी बी. बी. गिरी यांचा महसूल पंधरवाडा 2024 निमित्त उपविभागीय अधिकारी प्रा .संजय खडसे यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देवून गौरविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवा दादा पुरंदरे , व उपजिल्हाध्यक्ष अतिश राजे जाधव यांनी तहसील कार्यालयात जावून तलाठी बि.बी. गिरी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला

तलाठी बी बी गिरी हे कर्तव्य दक्ष असून आपल्या कामात चोख काम करत असतात गावातील शेतकऱ्यांना वेळेवर कामाची सेवा देत असतात याचं अनुषंगाने उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे यांनी त्यांचा महसूल पंधरवाडा 2024 अंतर्गत प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवा दादा पुरंदरे व उपजिल्हाध्यक्ष अतिश राजे जाधव यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *