बुलढाणा / सचिन खंडारे पोळा अर्थातच बैलांचा आनंदाचा सण त्याचबरोबर शेतकऱ्यांचाही सण आहेच बैल आणि शेतकरी अशी जोडी आहे की त्यामुळेच भारत कृषीप्रधान देश म्हणून गणल्या जात आहे,बैलाचा आणि शेतकऱ्यांचं आणि जमिनीचं नातं हे अतूट आहे एकमेकांना घट्ट करणारा आहे ,बैल आणि शेतकरी वर्षभर शेतामध्ये राब राब राबत असतो ,कापड कष्ट करून जमिनीमध्ये उत्पादन घेतो, अर्थात बैल हा शेतकऱ्यांना मदत करत असतो ,जसे अगोदर सहा बैलाचा किंवा बारा बैलाचा नांगर शेतामध्ये चालायचे,खरीप हंगामा पेरणी,वखरणे डवरणे,कोळपणे, असे विविध कामे बैलांच्या साह्याने शेतकरी करत असतो,आणि वर्षभर बैलाने केलेल्या कामासाठी त्याला एक दिवस आराम म्हणून बैला प्रति कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून पोळा हा सण श्रावण अमावस्या या तिथीला साजरा करण्यात येतो,शेतीप्रधान भारत देशात पोळा सणाला विशेष महत्त्व आहे खास करून महाराष्ट्र राज्य मध्ये पोळा सण मोठ्या आनंदात उत्साहात साजरा केला जातो ज्यांच्याकडे बैल नाहीत ते मातीचे बैल विकत घेऊन बैलांची पूजा करत असतात,पोळा सण महाराष्ट्र आणि छत्तीसगड मधील शेतकरी साजरा करत असतात,बैल आणि बैलांचे महत्त्व ओळखण्यासाठी या सणाला महत्त्व आहे,पोळा सणाच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलाला नदीवर किंवा हौद असेल ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल अशा ठिकाणी घेऊन जाऊन स्वच्छ साबणाने बैलाचे आंघोळ करतात,त्यानंतर सुंदर नक्षीकाम करून बैल सजवतात बैलावर झुल टाकतात , शिंगे सजवली जातात,गळ्यामध्ये घुंगराच्या घागर माळा घातल्या जातात,आणि त्यानंतर गावामध्ये असणाऱ्या देवस्थानाकडे बैलाला घेऊन जातात त्या ठिकाणी पूजा अर्चना केली जाते नंतर गावात असलेल्या विषयीमध्ये सर्व बैल एकत्र येतात त्या ठिकाणी मानाच्या बैलाला तोरणमाळ बांधलेली असते त्या खालून नेतात व त्यानंतर पोळा हा फुटलेला असतो ,त्यानंतर बैलाला घरी गोड नैवेद्य खाऊ घातला जातो बैलाची पूजा केली जाते,असे विशेष महत्त्व बैलाच्या सणाला विशेषता ग्रामीण भागामध्ये जास्त आहे,परंतु गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये जी बैलांची संख्या मोठ्या प्रमाणात खेड्यापाड्यांमध्ये दिसायची तेच बैल आज मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, अनेक शेतकऱ्यांनी आपले बैल काही कारणास्तव विकलेले आहेत किंवा चारा व इतर कारण असू शकते,झपाट्याने बैलांची संख्या कमी होत आहे वाढते कृषी यांत्रिकीकरण वाढते शेती यांत्रिकीकरण यामुळे बैलांची संख्या कमी आहे अनेक शेतकरी कमी वेळ लागावा म्हणून यांत्रिकीकरणाचा वापर शेतीसाठी करताना दिसत आहे उदाहरणार्थ ट्रॅक्टर द्वारे सुद्धा शेतीचे कामे मोठ्या प्रमाणात शेतकरी करत असतात त्यामुळे मानवी कष्ट व प्राण्याचे कष्ट कमी झाले आहे, बैल असताना रोज लागणारा ,सकाळी उठून चारापाणी करणे,बैल चारण्याकरता शेतात ने आण करणे ,चारण्या करता उपलब्ध नसलेले चराई क्षेत्र, आदी कारणामुळे बैलांची संख्या कमी झाली आहे, अनेक शेतकऱ्यांनी बैला करता लागणार चारासाठी चराई करता पडीत क्षेत्र ठेवलेले नाही,पडीत असलेली जमीन सुपीक करून ती शेती योग्य करण्याचा सपाटा सध्या सुरू आहे आणि त्यामुळेच बैल वागवणे किंवा बैलाची काळजी घेणे हे शक्य नसल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात बैल कमी होत आहे,
परंतु यांत्रिकीकरण किंवा ट्रॅक्टरने होत असलेली शेती व वाढणारी महागाई वाढणारे ट्रॅक्टरचे भाव डिझेलचे भाव यामुळे शेतीचा खर्चही वाढत आहे,आणि एक दिवस परत एकदा काही वर्षांनी बैल जोडीवरच शेती अवलंबून असेल असे म्हटले तर वागवे ठरणार नाही,त्यामुळे सध्या तरी बैलांचे होत असतील ते कमी संख्या नक्कीच शेतकऱ्यांसाठी, शेतीसाठी चिंतेचा विषय आहे .