प्रभारी तहसीलदार प्रविण धानोरकर यांचा यशस्वी कार्यकाळ …. त्यांच्या कार्यकाळात ३९ लक्ष ३८ हजार दंडात्मक कारवाई.

देऊळगावराजा :/ देवानंद झोटे सिंदखेडराजा तहसील विभाग कोणत्या ना कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध असते हा तालुका मोठा असल्यामुळे दररोज विद्यार्थी ,दिव्यांग ,संजय गांधी निराधार योजना ,खरेदी विक्री ,रेशन कार्ड मतदान नवीन नोंदणी तसेच प्रतिज्ञापत्र लेख या साठी दररोज या कार्यालयात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते .

मागील तहसीलदार सचिन जयस्वाल यांची कारकीर्द म्हणावी तशी चांगली राहिली नाही त्यांच्या कारकीर्दीत मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन मोठ्या प्रमाणात झाले .आर्थिक देवाण घेवान मुळे त्यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक कारवाई झाल्यामुळे त्यांच्या जागी प्रभारी तहसीलदार म्हणून प्रवीण धानोरकर १३ एप्रिल २४ पासून रुजू झाले .त्यांनी तहसीलदार पदाची सूत्रे हातात घेतल्यापासून त्यांच्या कार्यकाळामध्ये एकही तहसील कार्यालय समोर उपोषण झाले नाही त्यानंतर लाडकी बहीण योजने साठी लाभार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून

अंतर्गत रेशन कार्ड विभक्त करणे हे काम युद्धपातळीवर केले.

संजय गांधी निराधार योजनेचे दाखले देणे, पांदण रस्त्याची कामे मार्गी लावणे, शेतीबाबतचे प्रकरण निकाली काढणे ,

त्याबाबतची जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडली.

रेती उत्खन बाबत त्यांनी आज पर्यंत २० अवैध उत्खनन गौण खनिज वाहतूक करणाऱ्या विरुद्ध 39 लक्ष 38 हजार एवढी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे . तसेच त्यांच्याकडे सिंदखेडराजा येथील उपविभागीय अधिकारी यांचा अतिरिक्त कारभार असताणा डीग्रस बु येथील हजारो ब्रास रेतीसाठी जप्त करण्यात आला त्याची हरासी करून शासनास २३ लक्ष ६०४ रुपये महसूल जमा करण्यात आला . तसेच तालुक्यामध्ये कुठेही अवैध रेती उत्खनन होणार नाही त्याकरता छुपे रस्ते तोडण्यात आले व बैठे पथक तयार करण्यात आले असून त्या बाबत सर्व मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल सर्वांना कामाला लावल्यामुळे रेती तस्कराला बसला आहे.

या सर्व प्रकारामुळे प्रभारी तहसीलदार प्रवीण धानोरकर यांची सहा महिन्याची कारकीर्द यशस्वी ठरली असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *